आजकाल ड्रग्जच्या वादळाने चित्रपटसृष्टीत कहर ओढवला आहे. या प्रकरणात, जिथे बॉलिवूड देखील दोन गटात विभागलेला दिसतो, तसा हा विषय आता देशभर चर्चेत आला आहे. ड्रग्ज प्रकरणात रियाच्या अटकेनंतर आणखी बरीच बॉलिवुडसंबंधित नावे पुढे आली आहेत, परंतु विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त बॉलिवूड अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. याबाबत वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात अद्याप बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे उघड झाली नाहीत, आतापर्यंत केवळ अभिनेत्रींची नावे उघडकीस आली आहेत.उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. हे हसीस, गांजा आणि या सर्व गोष्टींसंबंधित चर्चा कोठून आली आहे, असं उज्जल निकम सांगतात. बॉलिवूड गँगवर बोलताना ते म्हणाले की, "दुबईत बसलेल्या काही लोकांच्या मदतीने काही बॉलिवूडमधील लोकं आपलं अस्तित्व बनवायचे .त्यानंतर बॉलिवूडमधील लोक विचार करू लागले की, कोणीही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही.", अशी माहिती एबीपी न्यूजने दिली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात जवळपास २० जणांना अटक केली आहे. या प्रकरणात बरीच मोठी नावेही समोर आली आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, नम्रता शिरोडकर अशी नावे आहेत. एनसीबीने या सर्व लोकांना बोलावून चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबी चौकशीत रियाने सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची नावे घेतली.
एनसीबीने बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगला ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवला आहे. एनसीबीने दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला सुद्धा समन्स पाठवला आहे. करिश्माने प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शुक्रवार म्हणजेच 25 सप्टेंबरपर्यंतची वेळ मागितली आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोणने तिचे ड्रग्स चॅटसमोर आल्यानंतर करिश्मा प्रकाश आणि टॅलेंट मॅनेजर जया साहाला यासाठी जबाबदार ठरवले आहे. या रिपोर्टनुसार दीपिका मुंबईत 12 लोकांच्या लीगल टीमशी व्हिडीओ कॉलने संपर्कात आहेत. दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग या टीमचा भाग आहे.
करण जोहरच्या पार्टीतला व्हिडीओ लॅबमध्ये याच दरम्यान असे कळतेय की 2019मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या कथित ड्रग्स पार्टीचा व्हि़डीओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. एफएसएल आता व्हिडिओची पडताळणी करेल. या पार्टीत दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन आणि रणबीर कपूरसह अनेक कलाकार दिसले होते. हा व्हिडिओ पाहून असं म्हटलं जात होतं की बॉलिवूड सेलेब्स ड्रग्स पार्टी करत आहेत आणि सगळे नशेत आहेत. करण जोहरने लोकांचे हे आरोप फेटाळून लावत, असे म्हणणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करु असे म्हटले होते.
जया सहा आणि अनुजकच्या चौकशीतून दीपिकाचे नावसमोरजया सहा व ड्रग तस्कर अनुजकडील चौकशीतून प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोनचे नाव पुढे आले. त्याचबरोबर तिच्याकडे मॅनेजर म्हणून काम केलेल्या करिश्मा प्रकाश हिच्याशी तिचा ड्रग चॅट एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे. 28 ऑक्टोबर 2017 मध्ये एका पार्टीमध्ये तिने 'माल'ची विचारणा केली आणि तिला गांजाची पूर्तता केली जाईल, सांगण्यात आले आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून विचारणा केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल
अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध
धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून