मुंबई -रियाला शवगृहात जाण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती, असा खुलासा राज्य मानवाधिकार आयोगाकडे कूपर वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाक गुज्जर यांनी एका वकिलामार्फत सोमवारी सुनावणीवेळी त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले. मात्र ही माहिती प्रतिज्ञपत्राद्वारे सात सप्टेंबरपर्यत सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे.
14 जूनला सुशांतसिहच्या आत्महत्येनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला होता, त्याठिकाणी १५ जूनला जाऊन रियाने त्याचे अंत्यदर्शन घेतले होते, एका कर्मचाऱ्याने त्यासाठी रियाला मदत केली होती. वास्तविक शवागृहात परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे तिला आत का सोडले?, अशी विचारणा राज्य मानवी हक्क आयोगाने कूपर रुग्णालय आणि मुंबईपोलिसांना केली आहे. त्या नोटिशीला मुंबई पोलिसांकडून मात्र अद्याप उत्तर देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती
जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता
Coronavirus : सहा दिवसांत दुसरा पोलीस ठरला कोरोनाचा बळी; गमावले तीन योद्धे