मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) बुधवारी त्याचा व्यवसायिक भागीदार वरुण माथूर याची चौकशी केली. सुशांतचे व्यावसायिक व आर्थिक संबंधाबाबत त्याच्याकडे रात्री उशिरापर्यंत विचारणा सुरु होती. दरम्यान, गोव्यातील हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या याच्याकडे दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली असून त्याचे मोबाईल फोन जप्त केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुशांतचा मित्र आणि व्यवसायिक भागीदार असलेल्या वरून माथूर हा दिल्लीत रहात असून त्याला यापूर्वी मुंबई पोलिसांनी चॊकशीसाठी बोलाविले होते. मात्र लॉकडाऊनमुळे तो चौकशीला येऊ शकलेला नव्हता. बुधवारी ईडीने त्याच्याकडे आर्थिक व्यवहाराबत कसून विचारणा केली. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या व्हाट्सअप चॅटवरून गौरव आर्याशी ड्रगबाबतचे संभाषण उघड झाले. त्यानंतर ईडीने त्याला चॊकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजाविली होती. त्यानुसार सोमवारी व मंगळवारी त्याची बिलार्ड पियार्ड येथील कार्यालयात चौकशी करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार गौरवने रियाशी भेटल्याचे मान्य केले. मात्र तिच्याशी ड्रगबाबत कसलाही चॅट, संभाषण किंवा व्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. रियाचा त्याबाबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट दाखविल्यानंतर त्याने माझ्याकडून फोन घेऊन अन्य कोणीतरी संभाषण केले असावे, असा दावा केला आहे. सुशांत राजपूतला आपण कधीही भेटलो नव्हतो, त्याच्या मृत्यूबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे त्याने सांगितले आहे. आर्या हा चौकशीला सहकार्य करीत नाही. त्याने मोबाईल चॅट डिलीट केले आहेत. त्यामुळे त्याचे डिजिटल डाटा तपासण्यात येणार आहे, त्यासाठी त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा