पणजी : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात गोव्यातील हणजुणे येथील ज्या द टामारिंड रिसॉर्टचे नाव चर्चेत येत आहे ते रिसॉर्ट ड्रग्स प्रकरणात एनफोर्समेन्ट विभाग आणि अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या स्कॅनरखाली आसलेला गौरव आर्या याचे आहे. त्या हॉटेलमध्ये कर्नाटकमधील एक आमदारही भागीदार असल्याचे तपासातून उघड झाले आहे.सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा या प्रकरणातील बड्या धेंडांची नावे समोर येत आहेत. राजकारण्यांचेही या प्रकरणाशी असलेले संबंध उघड होऊ लागले आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेली रिया चक्रवर्ती आणि गोव्यातील टामारिंड हॉटेलचे मालक गौरव आर्या यांचे अमली पदार्थ विषयक चॅट उघडकीस आल्यानंतर एनसीबीने (नार्कोर्टिक कंट्रोल ब्युरो) आर्या याला चौकशीच्या स्कॅनरखाली आणले. या आर्याचा धंद्यातील सहकारी आणि हॉटेल प्रकल्पातील भागीदारही असल्याचे तपासातून आढळून आले असून तो कर्नाटकातील एक आमदार आहे. आर्या याचे दुबईतही काही प्रकल्प आहेत आणि त्या ठिकाणीही या आमदाराची भागीदारी आहे. भोजे पाटील हा गोव्यातील प्रकल्पाचा गुंतवणूकदार आहे. ईडीला मिळालेल्या फोन कॉल डिटेल्सनुसार हे तिघेही कायम संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. या आमदाराच्या प्रत्येक धंद्यात भोजे पाटील आणि आर्या भागीदार असल्याचेही ईडीला चौकशीतून आढळून आले आहे.हणजुणे येथे हे द टामरिंड हॉटेल असून त्यात आर्या याने केफ कोटिंगो सुरू केले होते. सुरुवातीला केवळ आर्याचेच नाव आढळल्यामुळे तपास त्याच्यावरच केंद्रीत करण्यात आला होता.ईडीकडून केवळ आर्या यालाच समन्स बजावले होते. आता या हॉटेलचे इतर भागीदार भोजे पाटीलसह कर्नाटकमधील आमदारही स्कॅनरखाली आले आहेत.गोवा गुन्हेगारांचे आश्रयस्थान?गोव्याची भूमी गुन्हेगारांना गुन्हेगारी कारवायांसाठी सुरक्षित वाटत असावी. या प्रकरणातील केवळ ते वादग्रस्त हॉटेल गोव्याचे आहे. ज्या तीन व्यक्तींचे नाव गुन्हेगारीशी जोडले जात आहे ते गौरव आर्या, भोजे पाटील आणि कर्नाटकचा आमदार हे तिघेही गोव्याबाहेरील आहेत. एकाच वेळी ईडी आणि एनसीबीच्या रडारवर हे तिघेहीजण आले आहेत.सुशांतसिंहला कधीहीभेटलो नाही -गौरव आर्यासुशांतसिंहला आपण कधीच भेटलो नव्हतो, असा दावा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या याने केला आहे. ईडीने आर्या यास सोमवारी चौकशीसाठी बोलविले आहे. तो म्हणाला की, मी सुशांतसिंहला कधीच भेटलेलो नाही. २०१७ मध्ये मात्र मी रियाला भेटलो होतो.
माजी पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचा ड्रग्स प्रकरणात राजकीय दबावामुळे मृत्यू : काँग्रेसचा दावापणजी : गोव्याचे माजी पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांचा मृत्यू ड्रग्सप्रकरणी त्यांच्यावर मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री यांच्या दबावातूनच झाला असावा, असा संशय व्यक्त करून त्याच्या चौकशीची मागणी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.ड्रग्स प्रकरणात भाजपच्या एका माजी आमदाराला तसेच काही भाजप पदाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक प्रणव नंदा यांच्यावर दबाव आणण्यात आला व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.चोडणकर म्हणतात की, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा गोव्यातील ड्रग्स व रेव्ह पार्ट्यांशी संबंध लावला जात असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.सुशांतसिंह राजपूत याचा मित्र संदीप सिंग याचे भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांशी असलेले संबंध याचीही चौकशी व्हायला हवी. संदीप सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बायोपिक’ची निर्मिती केलेली आहे.