मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने अमलीपदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) अंधेरीतील वॉटरस्टाेन रिसाॅर्टमध्ये नुकतीच तपासणी केली. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या या ठिकाणच्या वास्तव्याच्या काळात त्याला भेटीसाठी येणाऱ्यांबाबत त्यांनी चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितलेे.गेल्या वर्षी सुशांत युरोप टुर अर्धवट सोडून थेट या रिसाॅर्टमध्ये येऊन थांबला होता. त्यानंतर तो या ठिकाणी विविध जणांना भेटत असे.यात फिल्म मेकर्ससह ड्रग्ज संबंधित काही मंडळींचा समावेश असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१९ ते जून २०२० या कालावधीत या ठिकाणी सुशांत थांबला असतानाची सर्व माहिती आता एनसीबी गाेळा करीत आहे. या कालावधीत तो कोणाला भेटला होता, कोणासोबत तेथे राहिला होता, रिसाॅर्टमध्ये थांबण्याचे कारण नेमके काय हाेते, अशा विविध प्रश्नांबाबत संबंधितांकडे एनसीबीकडून आवश्यकतेनुसार चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.सुशांतच्या आत्महत्येच्या तपासातून बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन चव्हाट्यावर आले आहे. या प्रकरणी एनसीबीने सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह संबंधित २३ जणांना अटक केली आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, राकूल प्रीत सिंग यांची चौकशी केली.
Sushant Singh Rajput death case : एनसीबीकडून अंधेरीतील ‘त्या’ वॉटरस्टाेन रिसॉर्टची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 2:48 AM