मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यानंतर आता मुंबई पोलीस निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याची चौकशी करणार आहेत. या आठवड्यात करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच, याप्रकरणी आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी होणार आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या ट्विटनुसार, मुंबई पोलीस या आठवड्याच्या अखेरीस करण जोहर याची चौकशी करू शकतात. त्याचबरोबर, धर्म प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची आज चौकशी केली जाणार आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी धर्मा प्रॉडक्शन आणि सुशांत यांच्यातील 'ड्राईव्ह' चित्रपटासंदर्भातील कराराची प्रतही मागितली आहे.
मीडिया रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये सुशांत आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्यात 'ड्राईव्ह' चित्रपटावरुन वाद निर्माण झाला होता. तसेच, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीने पोलीस चौकशीत करण जोहर आणि सुशांत यांच्यातील तणावाचा उल्लेख केला आहे. तसेच, 'ड्राईव्ह' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याच्या निर्णयावरून सुशांत नाराज होता. त्यामुळे या चित्रपटावरून सुशांत आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काही मतभेद होते का, याची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.
दरम्यान, सोमवारी (२७ जुलै) सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. महेश भट्ट हे काल सकाळी ११ च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर जवळपास दोन तास त्यांची चौकशी पोलिसांनी केली.
आणखी बातम्या...
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित
'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी
पब्जीसह २७५ चिनी अॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत
'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!