मुंबई - मृत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याकडे टॅलेंट मॅनेजर म्हणून काम केलेल्या जया शहा हिने दहा कोटी रुपये घेतले असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात वेळोवेळी सुशांतच्या बँक खात्यावरून ही रक्कम तिच्या बँक अकाउंटवर हस्तांतर करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी त्याच्याकडे केलेल्या तपासातून ही बाब समोर आली असून त्याने केलेल्या जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचा जबाब तिने अधिकाऱ्यांना दिला आहे.सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने जया शहाशी मोबाईल चॅटमध्ये सुशांतला ड्रग देण्याबाबतचे संभाषण मिळाले. त्यानुषंगाने ईडीने तिची सुमारे सहा तासाहून अधिक काळ चौकशी केली. आवश्यकतेनुसार तिला पुन्हा चौकशीला पाचारण केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.जया शहा ही सुशांतकडे वर्षभरापासून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्याला चित्रपट व जाहिरातीसाठी काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. त्यापूर्वी दिशा सालियन हे काम करीत होती, तिने ते सोडल्यावर जयाने या कालावधीत सुशांतकडून 10 कोटी रुपये कमावले असल्याचे बँक अकाउंटवरून स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी त्याबाबत तिला विचारले असता तिने ही रक्कम जाहिरातीच्या कमिशन म्हणून मिळाले असल्याचे सांगितले आहे. मात्र, या कामासाठी कलाकाराना मिळणाऱ्या मानधनाच्या सरासरी 3 ते 5 टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतली जाते, त्यामुळे सुशांतने गेल्या वर्षभरात किती जाहिराती केल्या, याचा सविस्तर तपशील तिच्याकडून मागविण्यात आला आहे. जरी 10 टक्के कमिशन गृहित धरले तरी त्यासाठी एका वर्षात सुशांतने 100 कोटीच्या जाहिराती केल्या पाहिजेत. मात्र, तितकी त्याची मिळकत नव्हती, त्यामुळे जया हिने इतके 10 कोटी का घेतले?, याबाबत चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जयाने ड्रग देण्यासाठी पैसे घेतले? जया शहा हिच्या कामाच्या तुलनेत दहा कोटी ही रक्कम खूपच अधिक आहे, त्यामुळे सुशांतला अमली पदार्थ मिळवून देण्यासाठी किंवा रिया चक्रवर्ती हिला रक्कम देण्यासाठी हे पैसे घेतले का, याचा तपास केला जात आहे. एनसीबीचे पथक त्याबाबत तिला ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?