गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने (३४) आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानुसार, त्याच्या बँक खात्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी मागवली होती. त्यात त्याच्या खात्यात जवळपास १० कोटी रुपये असल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने आर्थिक तणावातून आयुष्य संपविले असावे, ही शक्यता आता धूसर झाली आहे. वांद्रे पोलिसांनी सुशांत राजपूतच्या बँक खात्याची माहिती मागवली होती.केरळच्या पूरग्रस्तांना केली मदतसुशांत वांद्रे येथील घरात दरमहा ४ लाख ५१ हजार रुपये भाडे भरून राहत होता. त्याच्याकडे जवळपास ५० लाख रुपयांची दुर्बीण होती. केरळमध्ये पूर आल्यावर त्याने कोट्यवधी रुपयांची मदत पूरग्रस्तांना केली होती. तसेच त्याच्याकडे कामाची काहीही कमी नव्हती, असेही त्याच्या निकटवर्तीयांनी पोलिसांना सांगितले आहे.चार्टर्ड अकाउंटंट संजय श्रीधर यांचाही जबाब नोंदविला होता. सुशांतची खाती ज्या बँकांमध्ये होती, त्यांना पत्र पाठवून पोलिसांनी माहिती मागवली होती. त्याच्या बँक खात्यात १० कोटी असल्याचे त्यांना समजले. तसेच त्याच्या बहिणीनेही त्याला कोणतीही आर्थिक समस्या नसल्याचे पोलिसांना सांगितले.२७ जणांचे जबाबआतापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी जवळपास २७ जणांचे जबाब नोंदविले आहेत. मात्र, अजूनही त्याच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट करणारा कोणताच ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुशांतच्या मानसिक तणावावर उपचार करणाºया डॉक्टरने, पोलिसांशी निव्वळ तीन मिनिटे चर्चा झाली, असे सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, या डॉक्टरचा जबाब पोलिसांनी अद्याप नोंदविलेला नसल्याचे समजते.