अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी सतत कुठले ना कुठले वक्तव्य केले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत सतत वक्तव्य करून आणि लेख लिहून आपले मत मांडत असतात. या प्रकरणी आता संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जात आहे, ही तक्रार पाटणा येथे दाखल करण्यात आली आहे.एचएएमचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी पाटणा पोलिसांना ईमेल पाठवून ही तक्रार दाखल केली आहे. यामध्ये संजय राऊत यांच्याशिवाय बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर, बीएमसी अधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये चौकशी व अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.संजय राऊत हे सुशांत प्रकरणात सतत वक्तव्य करत आहेत, त्यामुळे वाद वाढला आहे. अलीकडेच संजय राऊत म्हणाले होते की, सुशांत आणि त्याचे वडील यांचे नाते चांगले नव्हते, कारण वडिलांनी पुन्हा लग्न केले होते. याशिवाय शिवसेना नेत्याने सुशांत आणि अंकिता यांच्या ब्रेकअपच्या चौकशीची केली असल्याची चर्चा होती.दुसरीकडे, बिहार आणि महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या या प्रकरणात एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे, तर महाराष्ट्र सरकार त्यास विरोध करत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे की, ही आत्महत्या मुंबईत घडली आहे, अशा परिस्थितीत पाटणा पोलिसांना चौकशीचा अधिकार नाही.यापूर्वी बिहार पोलिसांचे काही अधिकारी तपासासाठी मुंबई येथे पोहोचले होते, पण त्यांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळू शकले नाही. त्याच वेळी एका अधिका्याला जबरदस्तीने विलगीकरण कक्षात ठेवले गेले, त्यानंतर बिहार पोलिस अधिकारी परत आपल्या राज्यात आले. बिहार पोलिस आणि बिहारच्या नेत्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार-महाराष्ट्र पोलिसांकडून तपास योग्यप्रकारे न केल्याचा आरोप केला जात आहे.दुसरीकडे, बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी केलेली शिफारस केंद्राने मान्य केली. दरम्यान, रिया चक्रवर्ती हिने याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालय 13 ऑगस्ट रोजी याबाबत निर्णय देईल. याशिवाय सुशांतच्या खात्यातून काढण्यात आलेल्या 15 कोटींबाबत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांकडून सतत विचारपूस करत आहे. आतापर्यंत ईडीने रियाचे भाऊ-वडील आणि सुशांतचे माजी व्यवस्थापकची देखील चौकशी केली आहे, अशी माहिती आज तकने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप
कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद
काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी