जौनपूर - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग रजपूतआत्महत्या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथे अभिनेता सलमान खान आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यासह ५ जणांविरोधात वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी शनिवारी सीजेएम कोर्टात दावा दाखल केला. न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून दाखल केलेल्या खटल्यात आरोपींवर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग रजपूत यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आणि त्याच्याविरूद्ध कट रचल्याचा आरोप आहे.वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी सलमान खान, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, साजिद नाडियाडवाला, करण जोहर आणि अन्य अज्ञात आरोपींविरोधात वकिल उपेंद्र विक्रम सिंह आणि प्रवीण सिंह यांच्यामार्फत सीजीएम कोर्टात दावा दाखल केला आहे,अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे. अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे. इंडस्ट्रीने त्याला कायम डावलले असे ती म्हणाली होती. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर एक ट्विट केले. ‘छिछोरे या सिनेमानंतर सुशांतने 7 सिनेमे साइन केले होते. मात्र सहा महिन्यांतच त्याच्या हातून हे सर्व सिनेमे काढून घेण्यात आलेत. याच कौर्याने एका प्रतिभावान कलाकाराचा बळी घेतला,’ असे निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
सुशांतची आत्महत्यासुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे. यानंतर सोशल मिडीया आणि वृत्तवाहिन्यांवर बॉलिवूडमधील कृत्यांची चर्चा होऊ लागली. यावरून मुंबई पोलिसांनी ट्विट करत या अँगलनेही तपास करणार असल्याचे स्पष्ट केले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण
सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक
बेपत्ता ७० वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला, लोखंडी तारेने गळा आवळून हत्या
प्रेयसीला सोबत घेऊन कॅशियरनेच लावला बँकेला चूना; 'इतकं' किलो सोनं लंपास