मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतला पोलिसांनी पोस्टाने समन्स पाठवलेआहे. कंगनाचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी हे समन्स पाठवलं आहे. कंगना सध्या हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथे तिच्या मूळ गावी गेली आहे. लॉकडाऊनमुळे ती मुंबईत येऊ शकत नाही. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कंगना हिने जबाब देण्यासाठी आपणहून पुढाकार घेतला. पोलिसांचा समन्स पोहचण्याआधीच कंगनाने जबाब देण्याची तयारी दाखवली आहे.कंगनाचा जबाब घेण्याबाबत पोलिसांनी तिला 3 जुलै रोजी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी कंगनाच्या कार्यलयातील कर्मचाऱ्यांनी समन्स घ्यायला नकार दिला होता. पोलीस कंगनाच्या जबाब घेण्याबाबत अधिकृत काहीच बोलत नव्हते. यामुळे कंगनाने ट्विट करुन आपल्याला जबाब द्यायचा आहे आणि पोलीस आपल्या संपर्कात असल्याचं ट्विट केलं होतं. लॉकडाऊनमुळे कंगना सध्या तिच्या गावी मनालीला अडकली आहे. लॉकडाऊन शिथील होताच ती जबाब देण्यासाठी मुंबईत येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी
विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं
कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा