लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या पैशांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार बिहार पोलिसांकड़ून कागदपत्रे ताब्यात घेत, बँक खात्यातील व्यवहारांची झाडाझडती सुरू केली आहे.
ईडीने रिया चक्रवर्तीच्या कुटुंबीयांच्या दोन्ही बँक खात्यांच्या माहितीसह सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये सुशांतच्या खात्यात १७ कोटी होते. त्यापैकी १५ कोटी काढल्याचा आरोप त्यांनी केला. सुशांतच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रियासह अन्य मंडळींनी पैसे काढल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. रियाने त्याच्या खात्यातील पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा संशय त्यांनी वर्तवला. त्याअनुषंगाने तपास करणार असल्याचे तसेच पुढच्या आठवड्यात रियासह भाऊ शोविक आणि वडील इंद्रजीत यांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येणार असल्याचेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुशांतच्या खात्यात एवढे पैसेच नव्हतेच - सीएची माहितीसुशांतच्या खात्यातून गेल्या वर्षी १५ कोटी काढल्याचा आरोपानंतर, सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या खात्यात एवढे पैसेच नव्हते. त्यांनी यासंदर्भातील कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत. श्रीधर यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरापासून ते सुशांतसह त्याच्या कंपनीच्या खात्याचा व्यवहार हाताळत आहेत. सुशांतच्या खात्यातून रियाच्या आईच्या खात्यात ३३ हजार पाठविले होते. त्यानंतर कुठलाच व्यवहार झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे
खर्चाचा लेखाजोखाजानेवारी २०१९ ते जून २०२०२ कोटी ७८ लाख : जीएसटी तसेच आयकर६० लाख : भाडे६१ लाख : टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे पेमेंट२ कोटी : कोटक महिंद्रा बँकेत जमा२६ लाख : लोणावळा फार्म हाऊसचे भाडे४ लाख ८७ हजार : प्रवास खर्च५० लाख : विदेशी टूर्स२.५ कोटी : आसाम ते केरला टूर्स९ लाख : मिलाप या संस्थेला दान
रिया चक्रवर्ती म्हणते ‘सत्यमेव जयते’सध्या प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे मी शांत आहे. माध्यमांवर माझ्याबाबत विविध चर्चा रंगत आहेत. मात्र मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्यमेव जयते, असे म्हणत तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर ५ आॅगस्टपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आहे.