मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्याने NCB ने (Narcotics Control Bureau) रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सीबीआय, ईडी आणि आता NCB या तपास संस्था या प्रकरणात चौकशी करत आहेत. सुशांत सिंग आणि रिया यांना ड्रग्जचा पुरवठा केला जात होता याचे पुरावे ईडीला मिळाल्याचा दावा NCB चे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे.अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज धक्कादायक वळणं मिळत असून यातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती भोवती आता ईडी, सीबीआय बरोबरच NCB देखील आहेत. चौकशीचा फास आवळला गेला आहे. ड्रगच्या सेवनाबाबत तिच्या व्हाट्स अँप चॅटवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे NCBचे पथक लवकरच तिची चौकशी करणार आहे. दरम्यान, सीबीआयचे पथकही तिला कोणत्याही क्षणी चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. ईडीने रियाच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील चॅट तपासले असता त्यामध्ये तिने ड्रग पेडलर जया शहा हिच्याबरोबर सुशांतला ड्रग्जच्या वापर करण्याबाबतचा चॅटवर समोर आला. या कनेक्शनच्या अनुषंगाने ईडीने सोमवारी चौकशी करण्याबाबत एनसीबीला पत्र दिले होते. त्यानुसार NCBने तिच्याकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे या विभागाचे संचालक राकेश अस्थाना यांनी सांगितले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?