बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आलं आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. अद्यापही हत्येची एफआयआर दाखल झाली नाही असंही त्यांनी सांगितले आहे.अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणाची ज्या पद्धतीने चौकशी सुरू आहे. त्यातून कुणाला तरी वाचवण्यात येत आहे असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, सुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशाचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असाही आरोप राणेंनी केला आहे.सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार विरुद्ध बिहार सरकार यांच्यात मतभेदाची भिंत निर्माण झाली आहे. या वादात आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली आहे. सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. मुंबई पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही. मात्र, बिहारमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या 50 दिवसात आरोपींचा शोध मुंबई पोलिसांनी का लावला नाही' असा सवाल राणेंनी उपस्थितीत केला.सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सलियन होती. तिने आत्महत्या केली. पण या आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे. तिच्या गुप्तांगात जखमा आहे, त्यावरून तिचा बलात्कार झाला आहे, असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. त्यानंतर घरातील नोकरा दोन तासाने कळलं की, त्याने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर ठराविक रुग्णवाहिका का बोलावली? हॉस्पिटलला का नेण्यात आले होते' असे अनेक सवाल राणेंनी उपस्थित केले आहेत. दिनू मोरया कोण आहे? त्याच्या घरी अनेक मंत्री का जातात. त्याच्या घरी मंत्री आणि सुशांतची भेट झाली होती आणि तिथून ते पार्टीला गेले होते. ते मंत्री कोण आहे? अधिकारी त्यांना वाचवायचा प्रयत्न का करत आहे.' असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा
थरारक! मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून केली हत्या
"सुशांतचे वडील म्हणताहेत ते खरं नाही, कुठलीही लेखी तक्रार केलेली नाही!"- मुंबई पोलीस
आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात
मुसळधार पावसामुळे सुशांत सिंग प्रकरणी हायकोर्टातील याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली