तीन महिने, तीन तपास यंत्रणांनी अद्याप सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचे गूढ उघड केलेले नाही. परंतु आतापासून फक्त २ दिवसानंतर, सत्य उघड समोर येऊ शकते जे संपूर्ण देशास जाणून घ्यायचे आहे. सुशांतच्या पोस्टमॉर्टेम आणि व्हिसेरा अहवालावर एम्सच्या फॉरेन्सिक टीमचे मत समोर येणार आहे. १७ सप्टेंबर ही तारीख आहे, जेव्हा सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू हा आत्महत्या किंवा हत्येमुळे झाला याबाबत सत्य संपूर्ण देशासमोर येईल, १७ सप्टेंबरला एम्सच्या फॉरेन्सिक टीमची बैठक होणार आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या व्हिसेरा अहवालाचा खुलासा करेल. या व्हिडिओत पहा, सुशांतच्या आत्महत्येच्या सिद्धांतावर एम्सची टीम का पटत नाही?सुशांतची हत्या विष देऊन केली होती का? त्याच्या मानेवर असलेल्या खुणा कसल्या ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांना १७ सप्टेंबरला उत्तर मिळणार आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला तीन महिने झाले आहेत. 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये तो मृत अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टच्या आधारे सांगितले होते की, सुशांतचा मृत्यू गळफासामुळे गुदमरल्यामुळे झाला. परंतु बर्याच लोकांनी या अहवालाबद्दल शंका उपस्थित केली. सीबीआय चौकशी सुरू झाल्यानंतर दिल्लीच्या एम्स रुग्णालयाची टीम त्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहे.एम्सची ही टीम पुढील आठवड्यापर्यंत सीबीआयकडे आपला अहवाल सादर करेल. एम्सचे डॉक्टरांची टीम सुशांतच्या शवविच्छेदनाची चौकशी करीत आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी संशय व्यक्त केला आहे की, त्याची हत्या करण्यात आली आहे.
शुक्रवारी अहवाल येईल
मुंबई पोलिसांनी सुशांत ८० टक्के व्हिसेरा तपासासाठी वापरला असून २० टक्के व्हिसेरा एम्सच्या पथकाला मिळाला आहे. फॉरेन्सिक टीम या २० टक्के व्हिसेरामधून बरंच काही खोदून काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहारमध्ये एफआयआर नोंदविला सुशांतचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे म्हणत मुंबई पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टचा आधार घेतला होता. त्याच्या शरीरावर बाह्य जखम नव्हत्या. महिनाभरापासून मुंबई पोलिसांच्या तपासणीवर सुशांतचे वडील समाधानी नव्हते. त्यांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि रिया चक्रवर्ती हिच्यासह 6 जणांविरूद्ध एफआयआर दाखल केला. रियावर सुशांतला आत्महत्या करण्याचे व पैसे हडप करण्याचा आरोप आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या
दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक
‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."
पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप
रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं
उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे
इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका