मडगाव: गोव्यातील दोन शाळकरी मुलीच्या अपहरण प्रकरणात गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे संशयिताच्या मुसक्या आवळल्या. आशिष त्रिवेणी सरोज (२२) असे या संशयिताचे नाव असून, अपहत केलेली दुसरी मुलगी त्याच्यासोबत पोलिसांना सापडली. आज सांयकाळी मायणा - कुडतरी पोलीस संशयित व त्या मुलीला घेउन गोव्यात पोहचले. अपहरत झालेली अन्य एक मुलगी या आधीच मुंबई येथे पोलिसांना सापडली होती.इन्स्ट्राग्रामवरुन संशयिताने पिडीत युवतीशी मैत्री केली होती. व नंतर त्यांना मुंबई येथे बोलाविले होते. मुंबईत पोहचल्यानंतर एका युवतीला तेथेच ठेवून संशयिताने अन्य एका मुलीला पळवून उत्तर प्रदेश गाठले होते.
मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकावर तेथील पोलिसांनी एक मुलगी संशयास्पद सापडली होती. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ती गोव्यातून पळून आल्याची माहिती उघड झाली होतीन मागाहून मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांना याबददल कल्पना दिली होती. मंगळवारी पोलिसांनी मुंबई येथे जाउन त्या मुलीला ताब्यात घेतले होते तर एक पथक उत्तर प्रदेशात संशयिताच्या शोधासाठी रवाना झाले होते. उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील या पोलीस पथकाने आशिष याला जॉनपूर येथे पकडले व नंतर गोव्यात आणून रितसर अटक केली.
भारतीय दंड संहितेच्या ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गंत पोलिसांनी संशयित सरोज याच्यविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक पुढील तपास करीत आहेत.