शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

खळबळजनक! १ महिन्यापूर्वीच मुंब्य्रात राहायला आला होता संशयित दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 9:07 PM

The suspected terrorist : याआधी मुंबई एटीएसने नागपाड्यातून झाकीर हुसैन शेख यांना अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं. त्यानंतर मुंब्रा परिसरात ATS ने छापेमारी केली.

ठळक मुद्देकौसा मुंब्रा येथील चांद नगर येथील अवोन नूरी रेसिडेन्सीमध्ये रिझवान हा एका महिन्यापासून राहत होता.

एटीएसने मोठी कारवाई करत मुंब्र्यातील चांद नगर येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. रिझवान इब्राहिम मोमीन असं या संशयित दहशतवाद्याचं नाव असल्याची माहिती एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली आहे. कौसा मुंब्रा येथील चांद नगर येथील अवोन नूरी रेसिडेन्सीमध्ये रिझवान हा एका महिन्यापासून राहत होता. तसेच तो क्लासेस देखील घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

याआधी मुंबई एटीएसने नागपाड्यातून झाकीर हुसैन शेख यांना अटक केली होती. झाकीरच्या चौकशीत आणखी एकाचं नाव पुढे आलं. त्यानंतर मुंब्रा परिसरात ATS ने छापेमारी केली. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी ट्रेनमध्ये गॅस हल्ला करण्याचा कट रचत होते. या अलर्टनंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व मोठ्या रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. तर स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त इतर सर्व गेट्स बंद करण्यात आले. त्यात एटीएसनं रिझवान इब्राहिम मोमीन उर्फ इमरान उर्फ मुन्नाभाईला अटक करुन कोर्टात हजर केले.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला. त्यावेळी ६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत जोगेश्वरी येथून एका संशयिताला पकडलं होतं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जाकीरनं पकडलेल्या दहशतवादी मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया याच्याकडून हत्यारं आणि स्फोटकं घेतली होती. दहशतवाद्यांच्या चौकशीत मुंबई-दिल्ली एटीएस टीम देशभरात छापेमारी करत छुप्या दहशतवाद्यांना अटक करत आहे.

महाराष्ट्र एटीएसने झाकीर शेखला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात न देता त्याच्यावर स्वतःहून स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाल्याने काही दिवस तो मुंबई एटीएसच्या ताब्यात राहील. या कारवाईमुळे दिल्ली पोलीसबरोबर त्यांचा वाद झाल्याचे सांगण्यात येते. वास्तविक हा कट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला होता, तसेच झाकीरला पकडण्यासाठी मंगळवारी त्यांचे पथक मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्या तो हाती लागला नाही. एटीएसची कोठडी संपल्यानंतर त्यांना झाकीरचा ताबा मिळू शकतो. तोपर्यंत एटीएसच्या माहितीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीmumbraमुंब्राPoliceपोलिसArrestअटकAnti Terrorist SquadएटीएसMumbaiमुंबई