शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
2
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
3
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
4
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
5
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
6
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
7
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
8
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
9
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
10
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
11
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
12
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
14
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
15
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
16
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
17
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
18
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
19
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

गोमांसाचा संशय.. ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला शिवीगाळ, मारहाण; कायदा हातात घेणं भोवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 7:59 PM

वृद्ध व्यक्ती सोबतच्या पिशवीतून बरण्यांमध्ये भरून मांस नेत होती. ते ट्रेनमधील प्रवासात अन्य प्रवाशांच्या लक्षात आहे. यावरून काहींनी त्या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच मारहाणही केली.

चाळीसगावला राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात असताना कल्याण ते इगतपुरी रेल्वे प्रवासात गोमांस नेत असल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्रेनमधून जाणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने या वृद्धाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपांना पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले आहे. 

या प्रकरणाचे पुढे काय झाले, याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वृद्ध व्यक्तीने अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे. या निमित्त लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. 

महाराष्ट्रात गोमांस भक्षण करण्याला कायद्याने बंदी आहे. ही व्यक्ती सोबतच्या पिशवीतून बरण्यांमध्ये भरून मांस नेत होती. ते ट्रेनमधील प्रवासात अन्य प्रवाशांच्या लक्षात आले. यावरून काहींनी त्या वृद्ध व्यक्तीला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तसेच मारहाणही केली. यावरून एखाद्या व्यक्तीबाबत संशय आल्यानंतर या प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करणे गरजेचे होते. कायदा हातात घेऊन मारहाण करण्यापेक्षा त्या व्यक्तीकडे गोमांस आहे की अन्य कुठले मांस हे तपासणे गरजेचे होते. परंतू, प्रवाशांनी संशयावरून या व्यक्तीला मारहाण केल्याने आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपींना पकडले आहे. 

धुळे एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला होता. जळगावहून कल्याणला जाण्यासाठी वृद्ध व्यक्तीने ट्रेन पकडली होती. यावेळी सीटवरून या व्यक्तीसोबत तरुणांच्या टोळक्याने वाद घातला होता. ठाणे जीआरपी पोलिसांनी 5 हून अधिक जणांविरुद्ध भादंवि कलम 189(2), 191(2), 190, 126(2), 115(2), 324(4) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींनी ताब्यात घेण्यात आले असून त्यांना आणण्यासाठी पोलीस धुळ्याला रवाना झाले आहेत. 

एखाद्या व्यक्तीला संशयावरून मारहाण करणे किंवा वाद घालण्य़ापेक्षा पोलिसांना याची माहिती देऊन गोष्टीची शहानिशा करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :beefगोमांसIndian Railwayभारतीय रेल्वेkalyanकल्याण