फिरोजाबाद : उत्तर प्रदेश ही देशातील गुन्हेगारांची राजधानी बनली आहे. फिरोजाबादमध्ये एका सोनाराला त्याच्याच शेजारच्या दुकानदाराने जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या प्रकारात सोनार 80 टक्के भाजला आहे. सोनाराची प्रकृती पाहून त्याला आग्र्याला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या गुन्हेगारीवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
फिरोजाबादचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितले की, राकेश नावाचा सराफा व्यापारी बस डेपोच्या मागील दुकानात बसला होता. तेव्हा शेजारचा दुकानदार रॉबिन त्याच्याजवळ आला आणि बोलायला लागला. यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागात असलेल्या रॉबिनने राकेशच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ फेकला आणि माचिसद्वारे आग लावली व पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. राकेश 80 टक्के भाजला होता. त्याची आग शेजाऱ्यांनी विझविण्याचा प्रयत्न केला. राकेशला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर हालत पाहून त्याला आग्रा रुग्णालयात पाठविण्यात आले. सराफा बाजारात लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज मिळवून आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येणार आहे. पोलिसांनी यासाठी चार पथके बनविली असून आरोपी फरार आहे. रॉबिनचे लग्न राकेशच्या वडिलांनी करून दिले होते. त्याची पत्नी पूजाने 12 ऑगस्टला फास लावून आत्महत्या केली होती. रॉबिनला राकेशवर संशय होता. पूजा आणि राकेशमध्ये अवैध संबंध होते, त्याच दबावात येऊन तिने आत्महत्या केली, असे रॉबिनला वाटत होते.
यावर अखिलेश यादव यांनी सरकारला लक्ष्य़ केले आहे. भाजपाचे खासदार, आमदारच आता कायद्याचा धाक राहिला नसल्याचे आरोप सरकारवर करत आहेत. दुसरीक़डे गुन्हे थांबत नाहीएत. वाटतेय की राज्याची लगाम चुकीच्या लोकांच्या हाती गेली आहे. तर काँग्रेसनेही ट्विट करत योगी सरकारला लक्ष्य केले आहे. दररोज लूटमार, हत्या आणि बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरत आहे. इथे कधी, कोणासोबत काय होईल याचा नेम नाही. फिरोजाबादच्या मोठ्या व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याला जाळले. असे म्हणत घटनेचा व्हिडीओ टॅग करत योगी मॉडेलचा आणखी एक भयावह चेहरा, असे म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता
बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?
वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का
Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार
SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा
महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग
Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता