एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 04:27 PM2020-08-23T16:27:32+5:302020-08-23T16:34:23+5:30
- एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.
टिकमगड (मध्य प्रदेश) - एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या आढळल्याची घटना मध्य प्रदेशमधील टिकमगड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एका चार वर्षीय बालकाचाही समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेमागची कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे.
मध्य प्रदेशमधील टिकमगड जिल्ह्यातील खरगापूर ठाणे परिसरातील वॉर्ड क्रमांक आठमध्ये राहणारे मनोहर सोनी आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील पाच सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सुभाष द्विवेदी आणि एसपी प्रशांत खरे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या कारणांची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ६२ वर्षांचे धर्मादास सोनी त्यांची पत्नी पूना सोनी, २७ वर्षीय मुलगा मनोहर सोनी, २५ वर्षांची सून सोनम सोनी आणि चार वर्षीय सानिध्य सोनी यांचे मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत.
सरकारी नोकरीमधून निवृत्त झालेल्या एका व्यक्तीने आपली पत्नी आणि कुटुंबीयांसह गळफास लावून आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी या प्रकाराबाबत सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पुढील कारवाईस सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खरे यांनी सांगितले की, जेव्हा शेजाऱ्यांना सकाळपासूनच घरातील कुठलीही व्यक्ती बाहेर आलेली दिसली नाही तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मग पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा तिथे फासावर लटकलेल्या अवस्थेत पाच जणांचे मृतदेह दिसून आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये
ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा
केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती