प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील फुलपूर येथील भाजप खासदार केसरी देवी पटेल यांच्या चुलत सुनेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. भाजप खासदाराची चुलत सून प्रयागराजच्या काटजू भागात राहत होती.पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहेपोलिसांनी खासदाराच्या सुनेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले आहे. भाजप खासदाराच्या चुलत सुनेचा सल्फा खाल्ल्याने मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झाले आहे.मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळाभाजप खासदार केसरीदेवी पटेल यांच्या चुलत सुनेच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.नैराश्यात असायची सून ती सतत नैराश्यात जात होती, असा दावा मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या आत्महत्येमागे हे प्रमुख कारण असू शकते.
भाजप खासदाराच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 1:18 PM