शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगेशकरांना जमीन दान करुन पश्चात्ताप होतोय..! दीनानाथ रुग्णालयासाठी जमीन देणाऱ्यांची खंत
2
...अन् सगळ उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके
3
Nashik: नाशिकमध्ये पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी-सासूला मारली मिठी; मध्यरात्री घडला थरार
4
पीपीएफ योजनेचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज कधी करावा? 'ही' तारखी चुकली तर सर्व मेहनत पाण्यात
5
राष्ट्रवादीचे नेते अन् माजी महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल; आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
6
शेअर बाजारावर आहे मोदी सरकारची बारीक नजर, घेऊ शकतात मोठा निर्णय
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; रात्री सप्तपदी अन् सकाळी नववधूचा मृत्यू
8
"मला जे करायचं होतं ते करता येत नव्हतं...", 'चला हवा येऊ द्या'बद्दल नेमकं काय म्हणाली श्रेया बुगडे?
9
पहिल्या नऊ महिन्यांत ६० टक्के निधी खर्च करा; मंत्रालयातील वित्त विभागाच्या सर्व विभागांना सूचना
10
"बळजबरीनं सेक्स, ओपन मॅरेजसाठी दबाव टाकायचा..."; पत्नीचे प्रसन्ना शंकर यांच्यावर आरोप
11
टॅरिफ वॉर आणखी भडकणार...! अंड्यांपासून, सोयाबीनपर्यंत 'या' वस्तू महागणार; ट्रम्प यांच्या विरोधात 27 देशांची 'वज्रमूठ'
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे इलॉन मस्क गोत्यात? या कारणावरुन पहिल्यांदाच आमने-सामने
13
विशाल ददलानीचा 'इंडियन आयडॉल'ला निरोप, गेल्या ६ सीझनपासून होता परीक्षक; भावुक पोस्ट
14
बाळ झाल्याचा आनंद ठरला क्षणिक; वाळवटीतील गर्भवतीचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू
15
इंग्लंड क्रिकेट बोर्डाला संवेदनशीलता, खेळाडूंप्रति आदर नाही! सुनील गावसकर संतापले, कारण...
16
भाजपा नेते विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवासमधील खोलीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू  
17
मुस्कानच्या पोटात कोणाचं बाळ, सौरभ, साहिल की आणखी...? कुटुंबीयांनी केली 'ही' मागणी
18
आजपासून मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन, अनेक मोठे निर्णय होणार, असा आहे कार्यक्रम
19
याला म्हणतात संस्कृती! भर कार्यक्रमात बेर्डे कुटुंबीय अशोक सराफ यांच्या पाया पडले अन्...; पाहा व्हिडिओ
20
उपचाराविना पाठवले घरी; दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू: डॉक्टरांकडून हलगर्जीचा कुटुंबीयांचा आरोप

जर्मनीहून आलेल्या IITian युवकाचा संशयास्पद मृत्यू; ५ महिन्यापूर्वीच झालं होतं लव्ह मॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:39 IST

IIT तून एयरोनॉटिक्समध्ये इंजिनिअरींगची पदवी घेत अतुल २०२२ साली जर्मनीत नोकरीला गेला होता

जमुई - जर्मनीहून जमुईला आलेल्या इंजिनिअरचा धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. अतुल कुमार असं २८ वर्षीय मृतकाचं नाव आहे. रविवारी पत्नी प्रियासोबत तो पंचभूर धबधबा इथं फिरायला गेला होता. याठिकाणी पाय घसरून अतुलचा खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला असं पत्नीने म्हटलं आहे तर सुनेने षडयंत्र रचून मुलाची हत्या केली असा गंभीर दावा मृतक अतुलच्या आईने केला आहे. सून मुलाला टॉर्चर करायची असं सांगत आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

IIT तून एयरोनॉटिक्समध्ये इंजिनिअरींगची पदवी घेत अतुल २०२२ साली जर्मनीत नोकरीला गेला होता. होळीच्या निमित्ताने तो बिहारच्या जमुई या त्याच्या मूळ गावी आला होता. मुलाच्या मृत्यूनंतर आई सरितादेवी म्हणाल्यात की, प्रिया आणि तिच्या कुटुंबातील लोक माझ्या मुलासोबत शिवीगाळ करायचे. त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. २०१४ साली अतुलला IIT मुंबईत प्रवेश मिळाला होता. २०१९ साली तिथून शिक्षण पूर्ण करून तो बंगळुरूला जॉबसाठी गेला होता असं त्यांनी म्हटलं.

तर बंगळुरूत अतुल आणि मी एकाच कंपनीत काम करत होतो. आमच्यात आधी मैत्री झाली त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. अलीकडेच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. २०२२ साली अतुल जर्मनीला नोकरीला गेला. ३ वर्षाच्या अफेअरनंतर २२ नोव्हेंबर २०२४ रोजी आम्ही दोघांनी लग्न केले होते. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. आम्ही फिरायला गेलो तेव्हा माझा दीर सर्वात पुढे होता. अतुल त्याच्यामागे आणि मी शेवटी होती. मी त्या दोघांना वरती चढण्यापासून रोखत होते परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यांचा पाय घसरला. मी दीराला पकडणार इतक्यात अतुल खाली पडला असं पत्नी प्रियाने सांगितले आहे.

सर्व अँगलने करणार तपास - पोलीस

दरम्यान, या घटनेनंतर प्रियाने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत हॉस्पिटलला पाठवला. प्रथमदर्शनी हा अपघात पाय घसरल्याने झाल्याचे वाटते. परंतु या प्रकरणी गुन्हा दाखल करून सर्व अँगलने पोलीस तपास करतील असं अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस मृतक आणि त्याच्या पत्नीचे बँक व्यवहार आणि मोबाईल तपासणार आहे. मागील २ वर्षापासून त्यांच्यात नाते कसे होते तेदेखील शोधणार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी