जम्मू काश्मीर - तीन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या भारतीय सुरक्षा दलातील एका जवानाचा मृतदेह आज संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती मिळत आहे. मृतदेहावर कुठलीही जखम नाही आहे. तो त्याच्या बडगाममधील गावातून बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी बडगाममधील खग भागातील दलवाशच्या लब्रन गावातून गुरुवारी सैनिक असलेलया समीर अहमद मल्लाचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी सांगितले की, त्याच्या शरीरावर बंदुकीची कोणतीही जखम आढळली नसली तरी तो अतिरेक्यांनी मारला आहे का याचा तपास करत आहेत. खग भागातील दलवाशच्या लब्रन गावातून मल्लाचा मृतदेह सापडला आहे. “समीर अहमद मल्ला या सैनिकाचा मृतदेह मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सापडला होता, तो खग बडगामच्या लोकीपोरा गावातून बेपत्ता झाला होता,” पोलिसांनी सांगितले.
"प्राथमिक तपासादरम्यान, सैनिकाच्या शरीरावर बंदुकीची कोणतीही जखम आढळली नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास जोमाने सुरू आहे आणि त्याच्या मृत्यूची परिस्थिती सर्व बाजूंनी तपासली जात आहे,” पुढे पोलीस म्हणाले.जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री (JAKLI) चे सैनिक असलेले मल्ला रजेवर होते कारण त्यांच्या पत्नीने त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. मात्र, सोमवारी दुपारी ते बेपत्ता झाले. त्याचे काका हबीबुल्लाह मलिक म्हणाले की, मल्ला शेजाऱ्याला भेटायला गेला होता, पण घरी परतला नाही आणि त्याचा फोनही बंद होता.
मलिक म्हणाले की, मल्ला माझमा गावात त्याच्या सासरच्या ठिकाणी रात्र घालवत असे आणि दिवसा लोकीपोरा येथे परतायचे. “त्या दिवशी, तो आपल्या मोठ्या मुलासह घरी परतला. सासरी जाण्यापूर्वी, त्याने आपल्या आईला सांगितले होते की तो आपल्या मुलासह संध्याकाळी माझमाला परत जाईल,” असे सांगितले.
मल्लाचे काय झाले याबद्दल कुटुंबीयांना काहीही माहिती नसताना, अतिरेक्यांनी त्याचे अपहरण केले असावे आणि त्याच्या सुटकेसाठी आवाहन केले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. मल्ला २०१८ मध्ये चर्चेत आला होता जेव्हा लष्करी अधिकारी मेजर लीतुल गोगोई यांना श्रीनगरच्या हॉटेलमधून एका मुलीसह ताब्यात घेण्यात आले होते. मेजर गोगोई आणि मुलीला मल्लाने त्याच्या वैयक्तिक कारमधून हॉटेलमध्ये सोडले आणि हॉटेलच्या कर्मचार्यांशी वाद झाला जेव्हा हॉटेल व्यवस्थापकाने ती मुलगी स्थानिक रहिवासी असल्याचे आढळल्याने त्यांना बुकिंग नाकारले. मेजर गोगोई, ज्यांनी पूर्वी एका गावकऱ्याला त्याच्या जीपच्या बोनेटला बांधले होते आणि निवडणुकीच्या दिवशी त्याची गावोगावी धिंड काढली होती, त्यांच्यावर लष्कराने “स्थानिक महिलेशी सलगी” केल्याचा आरोप लावला होता.