जगभरात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना स्वित्झर्लंड (Switzerland) मध्ये घडली आहे. एका न्यायालयाने फक्त अकरा मिनिटांपर्यंत बलात्कार केल्याचं कारण देत आरोपींची शिक्षा कमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाचा हा निर्णय समोर येताच देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केली आहे. नागरिकांकडून संबंधित निर्णय मागे घेण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी बेसल येथील रहिवासी असणाऱ्या एका 33 वर्षीय महिलेला दोन पोर्तुगीज नागरिकांनी ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार केला. आरोपींपैकी एक 17 वर्षांचा आहे आणि दुसरा 32 वर्षांचा आहे. या खटल्याचा निकाल देताना महिला न्यायाधीशांनी सांगितलं की बलात्कार फक्त 11 मिनिटांपर्यंत झाला. हा तुलनेने कमी कालावधी आहे. हे कारण देत न्यायालयाने दुसऱ्या दोषीची शिक्षा 51 महिन्यांवरून कमी करून ती 36 महिने करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाला अद्याप न्यायालयाने कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही.
न्यायालयाच्या या निर्णयाला लोकांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच महिला न्यायाधीशानं पीडितेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. पीडितेनं आरोपींना शारीरिक संबंधासाठी संकेत दिले असावेत. त्यामुळे आरोपींचं धाडस वाढलं असावं. त्यामुळे ही एक किरकोळ चूक आहे, असंही न्यायाधीश यांनी म्हटलं आहे. पीडितेच्या वकिलांनी हा अत्यंत निराशाजनक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. महिला न्यायाधीशाच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांमध्ये बहुतेक महिला असून आंदोलन केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
खळबळजनक! भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर 6 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींपैकी 2 जण TMC चे कार्यकर्ते
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या पत्नीवर सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींपैकी दोन जण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ही महिला स्थानिक भाजपा कार्यकर्त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय महिलेवर तिच्याच घरात सहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकारण तापलं आहे.