शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 6:52 PM

जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

ठळक मुद्दे जेणेकरून हे पाणी पिऊन तेथील शिपाई, अन्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा कट त्याने आखला.गुरपिंदर हे कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्तव्यावर कार्यरत होते.ज्यावेळी पोलीस शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वेगळाच वास येत होता.

लुधियाना - भावाला अटक केल्याने एका तरूणाने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने बस्ती जोधेवालच्या कृ्ष्णा कॉलनी परिसरातील एका क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला. जेणेकरून हे पाणी पिऊन तेथील शिपाई, अन्य कर्मचारी आणि रुग्णांचा मृत्यू होईल, असा कट त्याने आखला.जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. बस्ती जोधेवाल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिपाई असलेल्या गुरपिंदर सिंग यांच्या तक्रारीवरून कृ्ष्णा कॉलनी येथे राहणारा वरिंदर उर्फ नितीका खुंसी आणि चूहड़पुर गावात राहणार त्याचा साथीदार गौरव आणि त्याची बहीण सिमरनविरुद्ध हत्येचा कट रचल्याप्रकरणात अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला अटक केली आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आले. येथून या तिघांनाही एक दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला आहे. पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत. तपास अधिकारी एएसआय राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपी वरिंदरचा भाऊ जतिंदर सिंग यांच्या विरोधात लुटमारी आणि लुटमारीचा कट रचणे यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी आरोपी जतिंदरला याआधी अटक केली होती. यावेळी या तपास पथकात शिपाई गुरपिंदर सिंग यांचा समावेश होता. त्याचा बदला घेण्यासाठी जतिंदरचा भाऊ वरिंदर याने गुरपिंदरविरोधात कट रचला. गुरपिंदर हे कृष्णा कॉलनीमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्तव्यावर कार्यरत होते. त्यामुळे त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने क्वारंटाईन सेंटरमधील दाखल असलेल्या रुग्णांनाही सोडणार नाही असे ठरवले आणि पाण्याच्या टाकीत विषजन्य पदार्थ मिसळला. ज्यावेळी पोलीस शिपाई गुरपिंदर सिंग पाणी पिण्यासाठी तेथे आले तेव्हा टाकीतून वेगळाच वास येत होता. त्या वासामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. यावेळी सोबतच्या कर्मचाऱ्यांना सांगितले तेव्हा कळाले आरोपी छतावर होते. यावेळी तपासादरम्यान आरोपींनी बदला घेण्यासाठी म्हणून या पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळला असल्याचं समोर आले. एएसआय राधेश्याम यांनी आरोपींना न्यायालयात सादर केल्यानंतर पोलिस रिमांडमध्ये पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती दिली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

टॅग्स :PoliceपोलिसPunjabपंजाबArrestअटक