आशिष राणे
वसई तालुक्यातील महसूल विभागात कार्यरत वसई मंडळ अधिकारी व त्यांचे ससूनवघर गावचे तलाठी तात्या या दोघांना त्यांच्या खाजगी इसमासाहित ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार २१ डिसेंबरच्या रात्री ७ च्या सुमारास पीडित तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
या कारवाईत सापळा पथकाने आरोपी शशिकांत मधुकर पडवळे वय- ५१ वर्षे , मंडळ अधिकारी, वसई, विलास धर्मा करे-पाटील वय - ३९ वर्षे, तलाठी, सजा- ससूनवघर , वसई आणि प्रविण छबुलाल माळी वय - ४३ वर्षे (खाजगी इसम) अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससुनवघर गावात राहणाऱ्या २३ वर्षीय पीडित तक्रारदार तरुणाने आपल्या नावे सात बारा व फेरफार नोंद प्रक्रियेसाठी ससूनवघर तलाठी कार्यालयात अर्ज केला होता तर या कामांसाठी त्याच्याजवळ सुरुवातीला १ लाख २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती
तर पुढे तडजोड करत ७० हजार देण्यास सांगितले आणि अखेर मंगळवारी तडजोडी अंती आरोपी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांस २० हजार रुपये व तलाठी करे पाटील याने २५ हजार रुपये असे दोघांनी मिळुन ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ केली अटक केली आहे व पुढील गुन्हा नोंद संदर्भातील कारवाई सुरू असल्याचे सांगितले
या एकुणच सापळा पथकाच्या कारवाईत पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक ठाणे अश्विनी संतोष पाटील यांच्या सोबत सपोफौ.सोंडकर,पोहवा.महाडिक , पोना.पाटील, मपोना.शिंदे, आणि चापोहवा.कदम आदींचा समावेश होता