शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

मालवणच्या वायंगणीचा लाचखोर तलाठी विठ्ठल कंठाळे 'अँटीकरप्शन'च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 8:51 AM

२५ हजारांची लाच मागितल्याने अटक; वाळू व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार कारवाई

मालवण : वाळू उपशावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यावसायिकाकडे २५ हजारांची मागणी करणाऱ्या वायंगणी तलाठी विठ्ठल वैजीनाथ कंठाळे (३४) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे आपल्या मित्रां समवेत तोंडवळी खाडी किनारी वाळूचा व्यवसाय करतात. त्यामुळे तलाठी कंठाळे हे वाळू उपसा करणाऱ्या रॅम्पवर येऊन तसेच वाळूच्या गाड्या थांबवून कारवाई न करण्यासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून याठिकाणी वाळू उपशाचे टेंडर मंजूर होऊनही अद्याप वाळू उपशाचे पास प्राप्त न झाल्याने गेले १५ ते २० दिवस तक्रारदार यांनी वाळू उपसा बंद ठेवला असतानाही तलाठी कंठाळे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी ५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या तक्रारीची पडताळणी करून सोमवारी २१ मार्च रोजी तक्रारदार यांच्या वाळू व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठी कंठाळे याला अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, स.पो. उपनिरिक्षक फाले, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, परब, पोलीस नाईक पालकर, पेडणेकर यांनी सहभाग घेतला. भ्रष्टाचाराबाबत काहीही माहिती असल्यास किंवा भ्रष्टाचारी लोकसेवका बद्दल तक्रार द्यायची असल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्ग विभाग, कार्यालय कुडाळ ०२३६२-२२२२८९ किंवा टोल फ्री नंबर १०६४ याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग