शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

तालिबानी अतिरेक्यांच्या समर्थकाला अटक; सोशल मिडियावर करत होता फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 9:30 PM

Talibani Terrorist : अतिरेकी असल्याचा संशय, अफगानी नागरिक, ११ वर्षांपासून छुपे वास्तव्य, शरिरावर मिळाली बंदुकीच्या गोळीची जखम 

ठळक मुद्देपोलिसांच्या भूवया उंचावल्या. आम्ही या संबंधाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले आहे.विशेष म्हणजे, आधी कंबल विकणाऱ्या मतिनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली.

नागपूर : तालिबानी अतिरेक्याच्या कट्टर समर्थकाला शहर पोलिसांनी जेरबंद केले. तो येथे ११ वर्षांपासून बिनबोभाटपणे वास्तव्याला होता. त्याच्या शरिरावर बंदुकीच्या गोळीची जखम (व्रण) दिसून आल्याने तसेच तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मिडियावर फॉलो करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. महत्वाचे म्हणजे, नूरचा मतिन नामक साथीदार अचानक फरार झाल्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाले आहे.

त्याचमुळे तपास यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नूर मोहम्मद (वय अंदाजे ३० वर्षे) असे नाव असलेला एक अफगानी नागरिक दिघोरी परिसरात राहतो. त्याचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनिय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी नूर मोहम्मदवर नजर ठेवली. सोशल मिडियावर तो तालिबानी अतिरेक्यांना फॉलो करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी नूर मोहम्मदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसेन्सही मिळाले. तो येथे २०१० पासून वास्तव्याला असल्याचे उघड झाले. नूर मोहम्मदच्या शरिरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशान (व्रण) आहे. त्याच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली असता तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मिडियावर फॉलो करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांच्या भूवया उंचावल्या. आम्ही या संबंधाने चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले आहे.

मतीन फरार, संशय अधिक घट्ट

नूर मोहम्मद येथे मतिन नामक साथीदारासह राहत होता. हे दोघे २०१० मध्ये नागपुरात येण्यापूर्वी नूर मोहम्मद ज्या गावात राहत होता, ते गाव तालिबानी अतिरेक्यांचा गड मानले जाते. त्याच्या कुटुंबात तिकडे आईवडील आणि दोन भाऊ होते. त्यातील आईवडील आणि एका भावाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ बेपत्ता असल्याचे नूरने सांगितल्याचे समजते. नूरला पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येताच मतिन फरार झाला. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला आहे. हे दोघे नुसते तालिबानी समर्थक आहे की तालिबानी अतिरेकी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मतिन पळाला आसामकडेविशेष म्हणजे, आधी कंबल विकणाऱ्या मतिनने नंतर नागपुरात अवैध सावकारी सुरू केली. त्यातून त्याने बनावट आधारकार्डसह अनेका कागदपत्रे जमविली. मोठी मालमत्ताही नागपुरात खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. फरार असलेल्या मतीनविरुद्ध २०१७ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. मतिन आसाम, मेघालयकडे पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय असून, त्या राज्यातील तपास यंत्रणांना तशी माहिती देऊन त्याला पकडण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत.

रेकीचा संशय, तपास यंत्रणा सरसावल्या

नागपूर शहर विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर खूप वर्षांपासून आहे. येथे यापूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी आत्मघाती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर, तब्बल ११ वर्षांपासून नागपुरात अवैध वास्तव्य करणाऱ्या नूर मोहम्मद आणि मतीनने नागपूरची रेकी करून तालिबानी अतिरेक्यांना सोशल मिडियावर काही मटेरियल पाठवले का, असा संशय आहे. त्यामुळे आम्ही कसून चाैकशी करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले. नूरकडून कसलेही शस्त्र जप्त करण्यात आले नाही. मात्र, एक व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये सापडला. त्यामुळे तो हिंसक वृत्तीचा असल्याचे लक्षात येते. या संबंधाने एटीएस, आयबीसह विविध तपास यंत्रणांनी नूर मोहम्मदची चाैकशी चालविली आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादnagpurनागपूरSocial Mediaसोशल मीडियाArrestअटक