तामिळनाडूच्या तंजावुरमध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या आरोपात माजी पोलिसाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आरोप आहे की, तरूण महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ वेब कॅममध्ये रेकॉर्ड करत होता. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत.
बाथरूममधील कॅमेराचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा तंजावुर साउथ रोडवर राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीने बाथरूममध्ये लेजर लाइट पाहिला. सरकारी शाळेत काम करणारी ही व्यक्ती पत्नी आणि मुलीसह राहतो. एक दिवस आंघोळ करताना त्याच्या पत्नीला बाथरूममध्ये लेजर लाइट दिसला.
त्यानंतर पत्नीने आपल्या पतीला ही संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पतीने बाथरूम चेक केलं. तर त्याला एका पावरबॅकला एक वेब कॅम फटीत लपवलेला दिसला. पावरबॅकची बॅटरी डाऊन झाली होती. एलईडी पुन्हा चार्ज करण्याचा संकेत देत होता. त्यामुळे लाइट चमकत होता.
महिलेच्या पतीने लगेच पोलिसात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली आणि शेजारी नासिर अहमदला अटक केली. तो एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी एका वादात पीडितने नासिरवर त्याच्या मुलीला छतावरून आंघोळ करताना पाहिल्याचा आरोप केला होता. पोलिसांना दिसलं की, वेब कॅमच्या बाजूच्या शौचालयाच्या माध्यमातून लावण्यात आला होता. शौचालय बाजूच्या रिकाम्या घरातील आहे.