भूतबाधेच्या नावाखाली तांत्रिकाने केला बलात्कार; ही महिला ७ वर्षांपासून सहन करत होती त्रास, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:37 PM2022-03-14T21:37:03+5:302022-03-15T21:05:10+5:30
Rape Case : तांत्रिकाने तिला नेमावर येथे भूतबाधा घालवण्याच्या बहाण्याने बोलावून बलात्काराची घटना घडवून आणली.
देवास - मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील पोलिसांनी एका तांत्रिकाला अटक केली आहे. या तांत्रिकाने भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार केला. रायसेन येथील रहिवासी असलेल्या महिलेला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. यातून सुटका करून घेण्यासाठी ती तांत्रिकाकडे आली होती. तांत्रिकाने तिला नेमावर येथे भूतबाधा घालवण्याच्या बहाण्याने बोलावून बलात्काराची घटना घडवून आणली.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ती रायसेन येथे राहते. गेल्या 7 वर्षांपासून त्यांना डोकेदुखीची तक्रार आहे. अनेक ठिकाणी आणि अनेक डॉक्टरांना दाखवले, पण तिचे दुखणे बरे झाले नाही. त्यानंतर महिलेच्या बहिणीने तिला तांत्रिक भगवानदास यांच्याबाबत सांगितले. तो नेमावर येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. जर तू त्याच्याशी बोललीस तर तो सर्वकाही ठीक करेल. वेदनेने त्रस्त झालेल्या महिलेने तांत्रिकाशी संपर्क साधला.
तांत्रिकाने हा प्रकार महिलेला सांगितला
संपर्कानंतर तांत्रिक महिलेच्या घरी आला आणि तिला भुताने पछाडल्याचे सांगितले. त्यातून मार्ग काढण्यासाठी काही तंत्र - मंत्र करावे लागणार आहे. त्याने महिलेला ४ जानेवारीला नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या नेमावरच्या वड्या देह गावात येण्यास सांगितले. महिलेने दिलेल्या पत्त्यावर वेळेवर पोहोचले. येथे तांत्रिक भगवानदास या महिलेशी बोलले. ती स्त्री त्याच्या जाळ्यात अडकली आणि तो जसे बोलत होता तसे करत राहिली.
जेव्हा महिलेला सत्य समजले
या महिलेने पोलिसांना सांगितले की, त्याच्या तंत्रक्रियेमुळे ती बेशुद्ध झाली आणि नंतर शुद्धीवर आल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. पोलिसांनी सांगितले की, 4 जानेवारीला तांत्रिकाने एका खोलीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला त्रास देऊ लागला. त्याच्या छळाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून नेमावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी तांत्रिक भगवानदास याला अटक करण्यात आली.