नाशिक : अत्यंत हुशार, चपळ अन गुन्हेगारांचा माग काढण्यात तरबेज असलेला 'गुगल' हा डॉबरमॅन प्रजातीचा श्वान मंगळवारी (दि.29) तीन वर्षांचा पूर्ण झाला. शहर पोलीस आयुक्तालयाच्या श्वान पथकातील या प्रशिक्षित श्वानने महत्वाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांना बहुमोल मदत केली आहे. त्याचा वाढदिवस केक कापून श्वान पथकातील कर्मचाऱ्यांकडून साजरा करण्यात आला.
कुठल्याही माहितीचा शोध अन प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जगभरात गुगल नावाचे सर्च इंजिन वापरले जाते. प्रत्येक प्रश्नाचे जसे गुगलकडे उत्तर मिळते. त्यामुळे गुन्हेगारांना शोधण्यासाठी अचूक माग काढण्यात पटाईत असलेल्या या श्वानालाही 'गुगल' अशी ओळख 3 वर्षांपूर्वी देण्यात आली. गुगल चा जन्म 20 सप्टेंबर 2017 साली झाला. 45 दिवसांचा असताना या श्वानाला माँरेन्स के-9 क्लब कडून पोलीस दलाला सोपविले गेले. यावेळी पोलीस शिपाई हस्तक गणेश कोंडे, अरुण चव्हाण यांनी त्याचे सहा महिने संगोपन केले. यानंतर सहा सुमारे वर्षभराच्या प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र चंदीगडला पाठविण्यात आले. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर गुगल श्वान अधिकच तरबेज झाला. या श्वानाने आतापर्यंत 70 कॉल वर हजेरी लावत गुन्हेगारांचा मग दाखविण्यात पोलिसांना मदत केली आहे. मुथुट फायनान्स कार्यालयावर पडलेल्या दरोड्याप्रसंगीसुद्धा गुगलची मदत घेतली गेली होती.
गुगलच्या कामगिरीचा राज्यस्तरीय गौरवगुगलने आतापर्यंत आठ ते दहा विशेष कामगिरी करत आपली कुशाग्रबुद्धिमत्ता दाखवून दिली आहे. मागील वर्षी गुगलने आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर राज्यस्तरीय पोलीस स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले होते. आपल्या हस्तकांशिवाय अन्य कोणावरही विश्वास न दाखविणारा हा गुगल जेवनसुद्धा त्यांनी दिलेलेच घेतो. श्वान पथकाच्या कार्यालयात अन्य कोणालाही तो फिरकू देत नाही. अत्यंत आक्रमक स्वभावाचा हा गुगल श्वान शहर पोलीस श्वान पथकाची एकप्रकारे शान आहे.