शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

Tauktae Cyclone : पी-३०५ बार्जच्या कॅप्टनवर यल्लो गेट पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 3:14 PM

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे.

ठळक मुद्दे पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-३०५ या बार्जवरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-३०५ बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ३०४(२),३३८,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पी-३०५ बार्जचा अपघात: चिंता, हुरहुर अन् अश्रू; आप्तांना शाेधण्यासाठी कुटुंबीयांची शवागृहाबाहेर गर्दी 

 

तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणाऱ्या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे. वादळाच्या तडाख्यात पी-३०५ हा बार्ज बुडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जणांचा शोध अद्याप सुरु आहे. ओएनजीसी कंपनीसाठी काम करणारे पी-३०५ हे बार्ज तौक्ते चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतरही समुद्रातच होते. १६ मे रोजी मध्यरात्रीनंतर बार्जचा नांगर तुटला. त्यानंतर १७ मे रोजी त्यांनी मुंबईच्या डिजिटल कम्युनिकेशन (डीजीसीओएम) केंद्राला नांगर तुटल्याबाबत माहिती दिली होती त्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले. तटरक्षक दल, भारतीय नौसेना यांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या अनेकांचे जीव वाचवले. 

पी-३०५ बार्जचा नांगर हा तौक्ते चक्रीवादळाच्या आधीच तुटला होता अशी माहिती मिळत आहे. मात्र, डीजीसीओएमने यासंदर्भात ओनजीसीचे प्रवक्ते हरीश अवल यांना कळवले असता त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. ऍफकॉन्सने त्यांची माणसे समुद्रात पाठवली होती अशी माहिती हरीश अवल यांनी दिली. ऍफकॉन्स ही कंपनी ओनजीसीसाठी काम करते. ऍफकॉन्सची माणसे त्या बार्जवर काम करत होती. मात्र ऍफकॉन्स  आणि ओएनजीसी या दोन्ही कंपन्यांनी बार्जची मालकी असणारे डूरमास्ट एंटरप्राइजेज आणि बार्जच्या कॅप्टनला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे.

आतापर्यंत ओळख पटलेल्यांची नावेनीलेश प्रकाश पितळे (वय ४५),  जोमीश जोसेफ (३५), अमलराज बर्नाबस (४३), विशाल वसंत काठदरे (३५), नवीन कुमार (२९), गोलेख चंद्रा साहू (५२), ससिन इस्माईल (२८), सुशील कुमार (२३), प्रमोद पाठक (४५), मनप्रीत बलवंत सिंह (२६), पप्पुराम उदाराम (३२), योगेश गिर गोसावी, अजहर युनुस गडी (२५), मोहन वामसी कृष्णा (३३), अजय शिवप्रसाद सिंग (३९)

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळPoliceपोलिसMumbaiमुंबईDeathमृत्यू