यवतमाळ : पोलिसांनी रविवारी रात्री धाड घालून दारव्हा रोड स्थित जसराणा अपार्टमेंटमधील कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. हा कुंटणखाना चक्क शिकवणी वर्ग घेणारी एका शिक्षिकाच चालवित असल्याची खळबळनजक माहिती यवतमाळ शहर पोलिसांच्या तपासात पुढे आली. या प्रकाराने काहीकाळ पोलिसांचाही गोंधळ उडाला.
जसराणा अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ठाणेदार धनंजय सायरे यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून पाेलिसांनी डमी ग्राहक बनून तेथे पाठविला. सोबतच शासकीय पंचही होते. या डमी ग्राहकाने पाचशे रुपयांच्या तीन नोटा संंबंधित महिलेला दिल्या. त्यानंतर त्या ग्राहकाने दबा धरुन बसलेल्या पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तात्काळ त्या फ्लॅटमध्ये धाड घालून कुंटणखाना चालविणारी महिला, रामकृष्णराव मस्के (वय ४२, रा. सिंचननगर) याला ताब्यात घेतले. तर देहविक्रीसाठी आणलेल्या ४० वर्षीय महिलेची सुटका केली. याशिवाय घटनास्थळावर अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. कुंटणखाना चालविणारी महिला ही शिक्षिका असल्याचे सांगण्यात आले. तिलाही १७ वर्षांची मुलगी असून ही मुलगी घरात असतानाच देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचे वास्तव कारवाईतून पुढे आले. याशिवाय नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक बी. जी. कऱ्हाळे यांनी मैथिलीनगर येथील कुंटणखान्यावर धाड घातली. तेथेही मुलीकडून देहव्यापार करून घेतला जात होता. पोलिसांच्या चार पथकांनी विविध ठिकाणी धाडी टाकल्या. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक विलास चव्हाण, बी. जी. कऱ्हाळे यांच्यासह फौजदार किशोर वाटकर, दर्शन दिकोंडवार, अवधूतवाडी ठाणेदार आनंद वागतकर यांच्या पथकाने कारवाई केली. यात १६ महिला शिपाई व १८ जवान सहभागी झाले होते.
हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका
नवीन कुंटणखाना उघडज्या नियोजित कुंटणखान्यासाठी ग्राहक पाठविला होता, तो बंद होता. मात्र तिसऱ्या मजल्यावर सुखवस्तू कुटुंबातच कुंटणखाना सुरू असल्याचे स्पष्ट झाले.