बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात, आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस पाठविली होती, परंतु ते आयकर कार्यालयात पोहोचले नाही. यानंतर आयकर अधिकारी अधिकारी थेट रॉबर्ट वाड्रा यांच्या कार्यालयात पोहोचले आणि वाड्रा यांचा जबाब नोंदविण्यात येत आहे.आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब दक्षिण पूर्व दिल्लीतील सुखदेव विहार कार्यालयात नोंदवले जात आहे. सूत्रांनी सांगितले आहे की, बीकानेर आणि फरीदाबाद जमीन घोटाळ्याप्रकरणी आयकर विभाग रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे.आरोपांनुसार रॉबर्ट वाड्रा यांच्या फर्म सनलाइट हॉस्पिटॅलिटीने राजस्थानमधील बीकानेरमध्ये जमीन घोटाळा केला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, वाड्रा यांच्या मालकीच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने ६९.५५ हेक्टर जमीन ७२ लाख रुपयांना विकत घेतली आणि नंतर एलेगेनी फिनलेज़ ला ५. १५ कोटी रुपयांना विकली. म्हणजेच ४. ४३कोटी रुपयांचा नफा झाला.