लाखांदूर (भंडारा) : रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्ता म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाखांदूरचे तहसीलदार निवृत्ती जगन उईके यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केली.
२४० रुपयांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील एक व्यक्ती रेतीची वाहतूक करीत होता. अवैध रेती वाहतूक प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी मासिक हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची मागणी तहसीलदार निवृत्ती उईके यांनी केली. याबाबतची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यावरुन बुधवारी सापळा रचण्यात आला. तहसीलदाराच्या कक्षातच १० हजार रुपये लाचेची मागणी संबंधाने उईके यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी केली.