तेलंगनाच्या वारंगल जिल्ह्यात युवकानं त्याच्या आजोबाच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह घरातील फ्रिजमध्ये ठेवला होता. त्यानंतर तो आरामात घरात राहत होता. युवकाच्या घरातून शेजाऱ्यांना अति दुर्गंध येऊ लागला तेव्हा स्थानिकांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी युवकाच्या घरावर धाड टाकली त्याठिकाणी जे दृश्य पाहिलं त्याने सगळेच हडबडले.
एका वृद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवून युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, ९३ वर्षाचे हे वृद्ध आजोबा होते. वारंगल जिल्ह्यातील परकल येथे ती नातू अखिलसोबत भाड्याच्या घरात राहत होती. या घरातून काही दिवसांपासून दुर्गंध येत होता. त्यामुळे शेजाऱ्यांना काही संशय निर्माण झाला. त्यांनी पोलिसांना याची माहिती कळवली. त्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घर सर्च केले.
पोलीस निरीक्षक महेंद्र रेड्डी यांच्या पथकाने घरात तपास केला असता त्यांना एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याचं आढळलं. हा मृतदेह खूप काळ इथे होते. त्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवून नातू निखीलला ताब्यात घेतले. घडलेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत निखीलनं जे सांगितले ते आणखी धक्कादायक होते.
निखील पोलिसांना म्हणाला की, ४ दिवसांपूर्वी आजोबा आजारी असल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याच्याकडे आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आजोबांचा मृतदेह त्याने फ्रिजमध्ये ठेवला. परंतु निखीलच्या कहाणीवर पोलिसांना विश्वास नाही. निखीलच्या आई वडिलांचा काही वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर निखील त्याच्या आजोबांसोबत राहत होता. आईवडील गेल्यापासून निखील मानसिक दडपणाखाली होता. त्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. वृद्ध व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद म्हणून नोंद करण्यात आला आहे. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर वृद्धाच्या मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होईल असं पोलीस सांगत आहेत. वृद्धाचा खून झालाय की खरचे आजारपणामुळे मृत्यू झाला या संशयाभोवती पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात ते लवकरच समोर येईल असा विश्वास पोलिसांना वाटतो.