लातूर : शहरातील रिंगराेड परिसरातील कन्हेरी नाका येथील एका पेट्राेल पंपासमाेर थांबविण्यात आलेला टेम्पाे अज्ञाताने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी समाेर आली. याबाबत गांधी चाैक पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लातुरातून पळविण्यात आलेला टेम्पाे उस्मानाबाद जिल्ह्यातील तावशीगड येथून जप्त करण्यात पाेलीस पथकाला यश आले आहे. मात्र, आराेपी पाेलिसांना गुंगारा देत फरार झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी राजेंद्र काशिनाथ काळे (३९ रा. बिरवली ता. औसा ह.मु. माेरेनगर, लातूर) यांनी आपल्या ताब्यातील टेम्पाे (एम.एच. २४ ए.बी. ६२९८) रिंगराेड परिसरातील कन्हेरी नाका परिसरातील एका पेट्राेल पंपासमाेर शुक्रवारी रात्रीच्या वेळी थांबविला हाेता. दरम्यान, शनिवारी सकाळी सात वाजता घटनास्थळी राजेंद्र काळे यांनी पाहिले असता, टेम्पाे आढळून आला नाही. परिसरात त्यांनी सर्वत्र शाेधाशाेध घेतली मात्र ताे हाती लागला आहे. अखेर याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी तपासाला गती दिली. चाैकशी सुरु केली. टेम्पाेबाबतची माहिती विविध पाेलीस ठाण्यांना कळविली. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे तावशीगड (ता. लाेहारा, जि. उस्मानाबाद) गावाबाहेर असलेल्या एका मंदिर परिसरात थांबविण्यात आला आहे. याबाबत अधिक चाैकशी केली असता, लातूर येथून पळविण्यात आलेला टेम्पाे असल्याची माहिती समाेर आली. पाेलिसांनी तातडीने तावशीगड गाठत टेम्पाे जपत केला. मात्र, टेम्पाे पळविणारा आराेपी फरार झाला आहे. ही कारवाई हेड काॅन्स्टेबल उमाकांत पवार, पाेलीस नाईक उमेश सूर्यवंशी, गणेश आकनगिरे यांच्या पथकाने केली.
याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस अधिक तपास करीत आहेत, असे पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे म्हणाले.