शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 4:50 PM

काटोल मार्गावर गंगानगर असून येथे नत्थुजी जमुनाप्रसाद साहू (वय ३६)  आपल्या परिवारासह राहतात. पत्नी आणि दोन मुले असलेले साहू भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

ठळक मुद्देसमोसा विकत आणण्यासाठी पैसे कुठून घेतले, अशी मोठ्या भावाने विरुला विचारणा केली. विरुची चोरी पकडल्यानंतर मोठ्याने आईजवळ चुगलीही केली.रात्री ८.३०च्या सुमारास वीरू घरात आला. यावेळी त्याच्यापेक्षा तीन वर्षे मोठा असलेला भाऊ घरात बसून होता तर आई शेजारीनसोबत समोर गप्पा करीत होती.

नागपूर : घरात कुणाला न सांगता दहा रुपये घेऊन समोसा विकत घेऊन येणे एका शाळकरी मुलांसाठी जीवघेणे ठरले. मोठ्या भावाने त्याची आईजवळ चुगली केली. एवढेच नव्हे तर समोसाही खाऊन घेतला. त्यामुळे लहान मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. समाजमन सुन्न करणारी ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. काटोल मार्गावर गंगानगर असून येथे नत्थुजी जमुनाप्रसाद साहू (वय ३६)  आपल्या परिवारासह राहतात. पत्नी आणि दोन मुले असलेले साहू भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा अकरा वर्षीय मुलगा वीरू याला रविवारी रात्री समोसा खायची इच्छा झाली. त्याने घरात ठेवलेले १० रुपये चुपचाप उचलले आणि बाहेरून समोसा विकत आणला. रात्री ८.३०च्या सुमारास वीरू घरात आला. यावेळी त्याच्यापेक्षा तीन वर्षे मोठा असलेला भाऊ घरात बसून होता तर आई शेजारीनसोबत समोर गप्पा करीत होती.

समोसा विकत आणण्यासाठी पैसे कुठून घेतले, अशी मोठ्या भावाने विरुला विचारणा केली. विरुची चोरी पकडल्यानंतर मोठ्याने आईजवळ चुगलीही केली. आईने विरुला रागावले. तिकडे मोठ्या भावाने विरुने आणलेला समोसाही खाऊन टाकला. त्यामुळे लहानगा वीरू क्षुब्ध झाला. रागाच्या भरात तो किचनमध्ये गेला. दार आतून लोटून घेत किचनमध्ये स्टूल ठेवून आईच्या साडीने त्याने गळफास लावून घेतला. स्टूल खाली पडल्याचा आवाज आला. वीरूच्या मोठ्या भावाने आईला आवाज दिला. आत मध्ये वीरूने गळफास लावून घेतला होता. ते पाहून आईने आणि भावाने आरडाओरड केली. आजूबाजूची मंडळी धावून आली. विरुला खाली उतरवून डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी विरुला मृत घोषित केले.

 परिसरात तीव्र शोककळाया घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. अवघ्या बारा वर्षाच्या मुलाने क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याच्या घटनेने पालकांना हादरवून सोडले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीnagpurनागपूरPoliceपोलिस