अकोला : बळवंत कॉलनी येथील रहिवासी असलेले तसेच सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथ्थूजी भगत आणि त्यांच्या पत्नी हेमलता भगत या दाम्पत्याची चोरट्यांनी निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. हे दोघेही शुक्रवारी पहाटे जळालेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याचे दिसून आले. हेमलता भगत यांच्या अंगावरील दागिने गहाळ असल्याने चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनीच त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. तो शुक्रवारी रात्री उशिरा खरा ठरला. भगत यांचे भाडेकरु मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा ४२ तसेच महमूदाबी वसीम परवीन खान ३६ राहणार इस्लामपुरा (जुने शहर, अकोला) यांनीच हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणात भाडेकरु पती-पत्नीला संध्याकाळी अटक करण्यात आली आहे.आझाद कॉलनी परिसरालाच लागून असलेल्या बळवंत कॉलनीमध्ये सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथ्थुजी भगत व त्यांच्या पत्नी हेमलता भगत हे दोघे रहिवासी आहेत. त्यांच्या बंगल्यामध्ये ते गुरुवारी रात्री झोपी गेल्यानंतर भाडेकरुंनी त्यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. त्यानंतर भगत यांच्या घरातील दागिने चोरी करीत असतानाच भगत दाम्पत्याने त्यांना विरोध केला असता, चोरट्यांनी या दोघांची गळा आवळून हत्या केली. तसेच सदर घरातील सिलिंडर खाली पाडून आग लावण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. भगत दाम्पत्याची हत्या केल्यानंतर घरातील साहित्य जाळून चोरट्यांनी पळ काढला; मात्र घरासमोरच असलेल्या एका शेजाऱ्याला त्यांच्या घरातून शुक्रवारी पहाटे धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी परिसरातील नागरिकांना जागे करत भगत यांच्या घरात धाव घेतली. घराच्या चारही बाजूचे दरवाजे आतून बंद असल्याने त्यांना आतमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामुळे नागरिकांनी भगत यांची मुलगी तसेच पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांची मुलगी व जावई यांनी तातडीने घरी धाव घेऊन पाठीमागील एका दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला असता नथ्थुजी भगत तसेच त्यांच्या पत्नी हेमलता भगत यांचा जळालेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याचे दिसून आले. या दोघांच्या मृत्यूला घातपाताची किनार असल्याची चर्चा असतानाच त्यांची गळा आवळून तसेच जाळून हत्या केल्याची माहिती शुक्रवारी रात्री समोर आली. त्यामुळे खदान पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला तसेच भगत यांच्या घरातील व त्यांच्या अंगावरील दागिने गहाळ असल्याने चोरीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणात रात्री उशिरा भाडेकरुंनी हत्या केल्याचे समोर आल्यानंतर दोघांनाही अटक करुन उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मो. रफीक मो. हमजा व त्याची पत्नी महमूदाबी यांनी अकोल्यातच घर का भाड्याने घेतले, यामागे हत्येचा कट होता का? या प्रश्नाचे उत्तरही पोलीस शोधत आहेत.भगत दाम्पत्याचे पाय होते जळालेलेसेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत व त्यांच्या पत्नी हेमलता हे दोघेच त्यांच्या घरात राहत होते. याच बाबीचा फायदा घेत त्यांच्या घरातील दागिने लुटले; मात्र या दोघांची अडचण झाल्याने चोरट्यांनी हेमलता भगत व नथ्थुजी भगत यांची गळा दाबून हत्या केली व नंतर या दोघांचेही पाय जाळले तसेच हे दाम्पत्य झोपले असलेल्या गाद्याही जाळल्याचे दिसून आले.गॅस सिलिंडरचा क्वॉक होता लीकनथ्थुजी भगत यांच्या घरातील गॅस सिलिंडर खाली टाकून त्याचा गॅस लीक करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यामुळे चोरट्यांनी हा खटाटोप कशासाठी केला, असा प्रश्न उपस्थित झाला होता.सहा लाखांचा मुद्देमाल पळविलासेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत यांच्या घरी भाड्याने असलेल्या महिला व पुरुषाने तब्बल ५ लाख ७0 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला.यामध्ये पाच लाखांचे सोन्याचे दागिने असून, ७0 हजार रुपये रोख असा मुद्देमाल या चोरट्यांनी पळविला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून या हत्याकांडाला आत्महत्येचा बनाव देण्याचा प्रयत्न केला.बारा तासात हत्याकांडाचा पर्दाफाशभगत दाम्पत्याची हत्या करून त्यांच्या घरातील सहा लाख रुपयांची रोकड पळविणाºया त्यांच्याच घरात भाडेकरू असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली, तसेच या दोघांकडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या हत्याकांडाचा तपास पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, खदानचे ठाणेदार किरण वानखडे, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी करून आरोपींना अटक केली.
भाडेकरू दाम्पत्याने केली घरमालक दाम्पत्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 10:06 AM
नथ्थूजी भगत आणि त्यांच्या पत्नी हेमलता भगत या दाम्पत्याची चोरट्यांनी निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.
ठळक मुद्देगुरुवारी रात्री झोपी गेल्यानंतर भाडेकरुंनी त्यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला.भगत दाम्पत्याने त्यांना विरोध केला असता, चोरट्यांनी या दोघांची गळा आवळून हत्या केली.दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली.