रोमॅंटिक नाइट दरम्यान एका बॉयफ्रेन्डने आपल्या गर्लफ्रेन्डवर हल्ला केला. अशात तरूणीला खिडकीतून उडी घेऊन आपला जीव वाचवावा लागला. मात्र, खिडकीतून उडी घेताना तरूणीचा पाठीचा कणा मोडलाय. याप्रकरणी कोर्टाने आरोपील बॉयफ्रेन्डला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना इंग्लंडच्या नॉर्थहॅम्पटनशायर शहरातील आहे. इथे राहणारा २८ वर्षीय तरूण कर्टिस थॉमसवर आरोप आहे की, त्याच्या त्याच्या प्रेयसीसोबत असं काही केलं की, तरूणीला पहिल्या माळ्यावरील खिडकीतून खाली उडी मारावी लागली.
मेट्रो वेबसाइटच्या रिपोर्टनुसार कर्टिस थॉमस आणि त्याची प्रेयसी नाइट आउटसाठी तयारी करत होती. प्रेयसीने जे कपडे घातले होते ते बघून थॉमस भडकला होता. यावरूनच दोघांमध्ये वाद पेटला. यानंतरही त्यांनी रात्र बेकार करायची नव्हती. ते पार्टीसाठी एका स्थानिक बारमध्ये गेले. पण तिथेही बॉयफ्रेन्डने तरूणीवर अशा काही कमेंट केल्या की, तिला असहज वाटू लागलं होतं. दोघेही अर्ध्या रात्री पार्टी करून घरी परतले.
दोघांमध्ये घरी आल्याववर पुन्हा वाद सुरू झाला. थॉमसने तरूणीला जोरदार धक्का दिला. ज्यामुळे ती घाबरली होती. त्यामुळे तिने स्वत:ला बाथरूममध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. पण थॉमसने तिला बाथरूममधून बाहेर खेचलं. अशात ती थॉमसला कशीतरी दूर करून पळून दुसऱ्या मजल्यावर गेली.
थॉमसने तिला मारहाण करू नये म्हणून तिने खिडकीतून खाली उडी मारली. जमिनीवर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, तिचा पाठीचा कणा मोडला आहे. तिच्या डोळ्यावर आणि चेहऱ्यावरही जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी थॉमसला अटक केली. कोर्टाने त्याला दोषी ठरवत दोन वर्ष चार महिन्यांची शिक्षा सुनावली.