शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

गुजरातच्या सर क्रीक भागात दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता : लेफ्टनंट जनरल ए. के. सैनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 8:51 PM

दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्ण सक्षम आहे...

ठळक मुद्देलष्कर विधी महाविद्यालयाकरिता सहा एकर जागा

पुणे : दहशतवादी संघटनांकडून देशाच्या दक्षिण तसेच भारत व पाकिस्तान सीमेच्या सर क्रीक भागात हल्ला होण्याची शक्यता आहे. गुप्तवार्ता विभागाकडून याबाबतची अधिक तपशील मिळाले असून त्याठिकाणी काही बोटी सापडल्या आहेत. यामुळे पुढील काळात दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन लष्करातर्फे उपाय योजना आखण्यात येत असल्याची माहिती लष्काराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. के सैनी यांनी सोमवारी दिली.राधा कालिदास दरयानानी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आर्मी लॉ विद्यालयासाठी सहा एकर जमीन दिली आहे. विद्यालयाच्या दुसऱ्या फेजचे उद्घाटन सैनी यांच्या हस्ते झाले. यावेळी सैनी म्हणाले, सर क्रिक भागातील दहशतवादी हल्लाचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्याभागातील लष्करी क्षमता वाढविण्यात आली आहे. दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्ण सक्षम आहे. दहशतवादी संघटनांनी हल्लाचे लक्ष ठेवले असले तरीही आम्ही त्यांचा यशस्वी प्रतिकार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. त्यामुळे सर क्रिक भागा विषयी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. तसेच क्रिक हा भाग भारत-पाकिस्तान सीमेलगत ९६ किलोमीटरचा खाडीचा भाग असून सीमेबाबत दोन्ही देशामध्ये वाद आहे. काश्मिर मधील संघषार्ला काही अंतर्गत बाबी बरोबरच बाह्य शक्ती कारणीभूत आहे. काश्मिरबाबत भारताचे धोरण स्पष्ट असून याभागात होणाºया संघषार्ला तोंड देण्याची तयारी केंद्र सरकारची आहे. तसेच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर पूर्णपणे तयार आहे. यापरिसरातील असणारे धोक्यांना तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहेत. यामुळे आमच्या कार्यशैलित बदल होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेGujaratगुजरातPoliceपोलिसTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान