रूपेश हेळवे
सोलापूर : विजापूर नाका पोलिस ठाणे व एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत नागरिकांमध्ये दहशत माजवणारा आरोपी अत्ताहुलाखान हारुन पठाण ( वय ४७, रा. लोकमान्य नगर, मजरेवाडी) याला सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. आगामी काळात विविध सण-उत्सव, मिरवणुका व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये व शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार अत्ताहुलाखान हारुन पठाण ( वय ४७, रा. लोकमान्य नगर, मजरेवाडी) हा आपल्या साथीदारासह गुंडगिरी करणे, शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे, अवैद्यरित्या रिक्षामध्ये घरगुती गॅस भरुन परिसरातील लोकांच्या जिवितास हानी पोहचवणे असे कृत्य केले आहे, त्याच्यावर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण ५ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यास २४ जून रोजी पासून विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेवून सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्हातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेले आहे, अशी माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी दिली.