सेक्स रॅकेटमध्ये अटक आलेल्या तरूणींचा धक्कादायक खुलासा, जेंडर चेंज करून ४ पुरूष बनले महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:31 PM2022-01-08T17:31:45+5:302022-01-08T17:34:40+5:30
Madhya Pradesh Crime News : स्पा मध्ये लपून देह व्यापाराचा धंदा सुरू असल्याची माहिती इंदुर क्राइम ब्रांचला मिळाली होती. यावर महिला पोलीस आणि क्राइम ब्रांचने संयुक्त कारवाई करत घटनास्थळावरून १८ तरूण आणि तरूणींना अटक केली होती.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरममध्ये(Indore) दोन दिवसांआधी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा (Sex Racket) पर्दाफाश केला होता. ज्यात अनेक विदेशी तरूणींनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केल्यावर पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, एटम स्पा सेंटरमधून १० तरूणी आणि ८ तरूणांना अटक करण्यात आली होती. ज्यातील ७ तरूणी थायलॅंडच्या होत्या. यातील चार तरूणींनी त्यांचा जेंडर चेन्ज (Gender Change) केलं होतं आणि पासपोर्टवर त्यांचं जेंडर मेल म्हणजेच पुरूष आहे. इतर तीन पासपोर्टची माहिती घेतली जात आहे.
जेंडर चेन्ज करून ४ पुरूष बनले महिला
स्पा मध्ये लपून देह व्यापाराचा धंदा सुरू असल्याची माहिती इंदुर क्राइम ब्रांचला मिळाली होती. यावर महिला पोलीस आणि क्राइम ब्रांचने संयुक्त कारवाई करत घटनास्थळावरून १८ तरूण आणि तरूणींना अटक केली होती. ज्यात १० तरूणी आणि ८ तरूण होते. स्पा सेंटर संचालक संजय ने पोलिसांना सांगितलं की, त्याने एटम स्पा ची फ्रेंचायजी घेतली आहे. याआधी त्याने स्वत:ला स्पा मॅनेजर सांगितलं होतं.
महिला पोलीस अधिकारी ज्योती शर्मा यांच्यानुसार, थायलॅंडहून ७ तरूणी आल्या, ज्यातील केवळ ४ थायलॅंडचे पासपोर्ट जप्त केले आहेत. चारही पासपोर्टवर या तरूणींचा जेंडर मेल लिहिलेला आहे आणि तरूणी आपला जेंडर चेन्ज करून स्पा सेंटरमध्ये देहव्यापार करत होत्या.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच बांग्लादेशहून तरूणी आणून इथे देह व्यापार करायला लावणाऱ्या दलालाला इंदुरच्या विजयनगर पोलिसांनी अटक केली होती. दोन तरूणी आणि ४ लोकही पकडण्यात आले होते. चौकशी दरम्यान समोर आलं होतं की, दलाल बांग्लादेशमधून तरूणींना इंदुरमध्ये आणत होता आणि दुसऱ्या भागांमध्ये सप्लाय करत होता.