शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
4
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
5
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
6
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
7
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
8
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
9
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
10
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
11
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
12
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
13
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
14
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
15
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
16
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
17
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
18
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
19
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
20
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान

पोटच्या लेकीचा सौदा करणाऱ्या मातापित्यांचा 'डाव' ठाणे पोलिसांनी हाणून पाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 10:37 PM

Crime News:विक्री करण्यासाठी आणलेल्या नवजात बालिकेचा जन्म हा ४ डिसेंबर २०२१ रोजी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय येथे झालेला असून, तिला घटनास्थळी ताब्यात घेतल्यावर पुढील सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आले आहे, पुढील तपास राबोडी पोलीस करत आहेत.

ठाणे : तीन मुलांच्या पाठोपाठ चौथी मुलगी झाल्याने त्या पोटच्या लेकीला दीड लाखांमध्ये विक्रीसाठी आलेल्या भिवंडीतील दाम्पत्यासह दलाल आणि दोन नातेवाईकांचा 'डाव' ठाणे शहर पोलीस दलाच्या ठाणे गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. यावेळी सहा जणांना अटक करून 'त्या' ३ ते ४ दिवसांच्या मुलीला सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.      भिवंडीतील वकील अन्सारी व मुमताज अन्सारी हे त्यांची ३ ते ४ दिवसांपूर्वी जन्मलेली मुलगी दीड ते दोन लाख रूपये किंमतीस विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहेत, अशी बातमी ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी बनावट खरेदीदार बनुन नवजात बालिकेची विक्री करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. त्या नवजात बालिकेचे आई-वडील व मध्यस्थी महिला यांनी नवजात बालिकेचा दीड लाखात सौदा ठरविल्यावर त्यांना ठाण्यातील कॅसल मिल नाका येथील स्वागत हॉटेल, येथे नवजात बालिकेस घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी त्या हॉटेलमध्ये सापळा रचून ठरल्याप्रमाणे नवजात बालिकेचे विक्रीकरिता आलेल्या व्यक्तींनी बनावट खरेदीदार बनुन गेलेल्या पोलीसांकडुन दीड लाखांची रक्कम स्विकारून त्यांच्याकडील नवजात बालिकेला सुपुर्द करताच त्यांना ताब्यात घेत, त्यांचा डाव हाणून पाडला. तर भिवंडी शांतीनगर मधील रिक्षाचालक वकील शकील अन्सारी (३७) त्याची पत्नी मुमताज या दाम्पत्यासह मुमताज हिचे बहीण - भाऊ कायनात रिझवान खान (३०) आणि मुझम्मिल रिझवान खान (१८) रा. मुंब्रा तसेच दलाल झिनत रशिद खान (२२) व वसीम इसाक शेख (३६) रा. मुंब्रा अशा सहा जणांविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७० सह द जुवेनाईल जस्टीस केअर अॅन्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स अॅक्ट २०१५ चे कलम ८०,८१ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना राबोडी पोलिसांच्या हवाली केले.         विक्री करण्यासाठी आणलेल्या नवजात बालिकेचा जन्म हा ४ डिसेंबर २०२१ रोजी भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय येथे झालेला असुन, तिला घटनास्थळी ताब्यात घेतल्यावर पुढील सुश्रुषेसह संगोपनासाठी डोंबिवलीच्या जननी आशिष चॅरीटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आले आहे, पुढील तपास राबोडी पोलीस करत आहेत. ही  कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख,पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड, सहायक पोलीस उप निरीक्षक रविंद्र पाटील,पोलीस  हेडकॉन्स्टेबल विक्रांत पालांडे, हरिष तावडे, भरत आरवंदेकर, पोलीस नाईक शब्बीर फरास, नंदकुमार पाटील, अमोल देसाई, दिपक जाधव, पोलीस शिपाई सागर सुरळकर, तेजश्री शेळके,  माधुरी जाधव, पोलीस नाईक बाळु मुकणे या पथकाने केली.

 

" त्या दाम्पत्याला पहिले तीन मुले आहेत. त्यातच त्यांना चौथी मुलगी झाली. म्हणून त्यांनी त्या मुलीचा सौदा केला. त्या दाम्पत्यासह सहा जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे." - अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनीट १, ठाणे.

टॅग्स :ArrestअटकthaneठाणेPoliceपोलिस