ठाणे - शहरातील कळवा, नौपाडा, शिळ डायघर तसेच राबोडी ठाण्या अंतर्गत दाखल झालेल्या सोनसाखळी चोरींचा छडा अखेर ठाणे पोलिसांच्या अॅन्टी रॉबरी सेलने लावला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, या प्रकरणी पाच पैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख २७ हजारांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कळवा, राबोडी, नौपाडा, शिळ डायघर या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन चोरणाºया चार आरोपींना उपायुक्त डॉ. डी .एस .स्वामी व त्यांच्या सहकाºयांनी पकडले. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाणे शहराच्या हद्दीत चैन स्नेचिंग करणारे मोक्काचे आरोपी हे अजमेर, राजस्थान येथे वास्तव्यास असल्याचे समजले. त्यानुसार त्यांना पकडण्यासाठी अँटी रॉबरी सेलचे पथक अजमेरला रवाना झाले. या पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे ,पोलीस नाईक सुरेश चव्हाण हे अजमेर येथे पोहचले व वेषांतर करून त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरु वात केली. दहा दिवस सतत मागोवा घेतल्या नंतर अजमेर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी सरफराज फिरोज बेग उर्फ सय्यद व त्याचे चार साथीदारांना पकडण्यात त्यांना यश आले. त्यांना ताब्यात घेऊन ते ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी कळवा पोलीस स्टेशन च्या हद्दीत ६,राबोडी येथे १, नौपाडा येथे १ असे एकूण ८ चैन स्नेचिंगचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्या कडून ४,३५,००० रु पयाचे २३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. तसेच कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी आपल्या हद्दीतील पोलीस गस्त मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या. अशीच गस्त घालत असतांना दुचाकीवरुन येऊन मंगळसूत्र खेचून पळणारा एक आरोपी रीझवान ईस्माईल शेख हा रंगेहाथ सापडल. या आरोपीने निजामपूरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक दुचाकी चोरली होती. त्या वरून तो व त्याचा साथीदार अली उर्फमामु साहिद हे कळवा येथील एका महिलेचे मंगळसूत्र खेचून पळत असताना पोलीस नाईक कोटकर व ढेबे यांनी पाठलाग करून त्यांना रँगेहाथ पकडले. त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ ,नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ व शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १ असे नऊ गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्या कडून ३,९३,००० रु पये किंमतीचे १६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. अशा प्रकारे पोलीसांनी सगळ्या आरोपींकडून एकूण १७ गुन्हे उघडकीस आणून ८,२७,००० रूपयाचा माल हस्तगत केला आहे. यातील तीन आरोपींवर यापूर्वी मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच हे चोर चोरीसाठी वाहनांचा वापर करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटक आरोपींनी २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे पोलिसांनी आवळल्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या *चार अटकेत, ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 3:52 PM
विविध पोलीस ठाण्याच्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया चोरांच्या ठाणे पोलिसांच्या अॅन्टी रॉबरी सेलने मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ठळक मुद्देअटक आरोपींना २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी१७ गुन्ह्यांची झाली उकलराजस्थानमधील अजमेर मधून सोनसाखळी चोर अटकेत