ठाणे: ठाणे शहर पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे पोलीस स्कूलच्या अधिकृत ईमेल आयडीवर शनिवारी २१ जानेवारी रोजी ५.३७ वाजेच्या सुमारास 'लष्कर'च्या नावाने धमकीचा मेल आला आहे. मुंबई के स्कूल और कॉलेज मे धमाके करेंगे...कुर्बानी और धमाका असे दोनच मार्ग आपल्यापुढे असल्याचेही या मेल मध्ये म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या शाळा बंद असल्याने कोणीही हा मेल बघितला नाही. मात्र, रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पोलीस स्कूलमध्ये होणार होती. त्यामुळे या शाळेतील एक शिक्षिका शनिवारी शाळेची पाहणी करण्यास आल्या होत्या. त्यानंतर शाळेच्या ई-मेल आयडीवर काही सूचना, संदेश आला का ते पाहण्यासाठी त्यांनी लॅपटॉप उघडला. तेव्हा त्यावर लष्कर-२९ लष्कर२२ ॲट दि रेट प्रोटोनमेल डॉट कॉम या मेलवरून मिशन २२ असा विषय लिहिलेला एक मेल आल्याचे त्यांनी पाहिले.
त्यांनी हा मेल उघडला असता “मै जावेद खान लष्कर २९ का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ …. हमारा एकही मक्सद है पुरे हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो.. तभी यह देश प्रगती करेगा. इस लिए हमने दो मार्गो का स्वीकार किया है कुर्बानी और धमाका. हम पुरी दुनिया को दिखाना चाहते है की जिहाद सिर्फ एक नहीं बलकी सभी धर्मो के लोगो के लिये है, हम चाहते है की पुलीस हमे पकडे, मीडिया के सामने हमारे विचार लोगो तक पहुचे इसलीये हम अपनी जान की कुर्बानी देने के लिये भी तैयार है," असा या मेलमध्ये मजकूर आहे.
"हिंदुस्थान मे जिहाद पालन करने मे सबसे बडी प्रॉब्लम यहा की एज्युकेशन सिस्टम है. यहा की एज्युकेशन सिस्टम बंद करके सिर्फ मदरसा द्वारा शिक्षा देनी चाहिए. तभी जिहाद के बारे मे पुरी जानकारी मिलेगी. हम मुंबई के स्कुल और कॉलेज मे धमाके करेंगे," अशी धमकी देखील या मेलमध्ये दिली आहे. या घटने प्रकरणी स्कूलच्या शिक्षिकेने ठाणेनगर पोलिसात धमकी आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (फ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सायबर पोलीस, क्राईम ब्रांच आणि ठाणेनगर पोलीस समांतर तपास करीत आहेत.