लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७४५ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात संचारबंदीचे उल्लंघन करणे, विनाकारण वाहने रस्त्यांवर आणणे, कोरोनाची लक्षणे असतांना तसेच विलगीकरणात ठेवलेले असतांनाही बाहेर फिरणे अशा अनेक कारणांमुळे साथ प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८ तसेच कलम २६९ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. २२ मार्च ते ५ मे २०२० या ४२ दिवसांच्या कालावधीमध्ये मीरा रोडमध्ये ९८१ आरोपींविरुद्ध ३०२ गुन्हे दाखल झाले. तर भार्इंदरमध्ये दोन हजार १३५ जणांविरुद्ध २७१ गुन्हे नोंदविले गेले. शहापूरात २०८ जणांविरुद्ध ८५ गुन्हे, मुरबाडमध्ये १२४ जणांविरुद्ध ४३ तर गणेशपूरी विभागात ९१ जणांविरुद्ध ४४ गुन्हयांची नोंद झाली. याशिवाय, मनाई आदेशाचा भंग करणा-या तिघांविरुद्ध तर औषध द्रव्य कलमाखाली मुरबाडमधील दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या साडे तीन हजार जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 1:34 AM
ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
ठळक मुद्देभार्इंदरमध्ये सर्वाधिक दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे४२ दिवसांमध्ये ७४५ गुन्हे