Thane Crime News : अलिकडे Honey trap च्या अनेक घटना समोर येत आहेत. ज्याद्वारे व्यक्तीची महिलांकडून फसवणूक केली जाते आणि त्यांना ब्लॅकमेल करून रक्कम मागितली जाते. अशीच एक घटना ठाणे शहरातून समोर आली आहे. येथील एका दुकानदाराला Honey trap फसवण्याची आणि त्याच्याकडून 6.9 लाख रूपये वसूल केल्याची ही घटना आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन पुरूषांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दुकानदार श्री नगर भागात एक ऑप्टिकलचं दुकान चालवतो.
गेल्या सप्टेंबरमध्ये आरोपी महिलेने दुकानदारासोबत मैत्री केली. त्यानंतर चलाखीने त्याच्याकडून अनेकद पैसे उकळले. एका न्यूज एजन्सीनुसार, 1 एप्रिल 2023 ला महिलेने दुकानदाराला काही कामाच्या बहाण्याने ठाणे चेक नाक्यावर बोलवलं आणि त्याला कपडे खरेदी करण्यात मदत करण्यास सांगितलं. जेव्हा दुकानदार तिला जवळच्या दुकानात आपल्या दुचाकीवरून नेत होता, तेव्हाच महिलेच्या पतीने दोघांना पकडलं आणि धमकावलं.
महिलेच्या पतीने दोन इतर पुरूषांसोबत कथितपणे दुकानदाराला महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं. सोबतच पत्नीची छेडछाड केल्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करतो अशी धमकीही दिली.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपींनी वेळोवेळी दुकानदाराकडून एकूण 6.9 लाख रूपये कथितपणे वसूल केले. महिलेच्या पतीने नंतर दुकानदाराकडे 50 हजार रूपये मागितले. ज्यानंतर दुकानदाराने 13 मे रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापडा रचत चारही आरोपींना अटक केली. पुढील चौकशी सुरू आहे.