मुंबई : नक्षली कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या माओवादी संघटनेचा सदस्य हुलाश यादव (४५) याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. सरकारने त्याच्यावर १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत यादव हा औषधोपचाराकरीता नालासोपारा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून यादवला ताब्यात घेतले आहे. यादव हा मुळचा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे. तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओ) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटी सदस्य आहे. तो सन २००४ पासून नक्षली कारवाई मध्ये सक्रिय असून त्याच्यावर सरकारने १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. आरोपीबाबत झारखंड पोलीसांना माहिती देण्यात आली असून, त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.