अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र कुमार यांना हिंदू देव-देवतांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणं महागात पडलं आहे. याप्रकरणी एएमयूने प्राध्यापकाला निलंबित केले आहे. मात्र, प्राध्यापकाने लेखी माफी मागितली होती. डॉ. जितेंद्र यांच्याशी संबंधित वादग्रस्त पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन प्रकरणात भादंवि कलम १५३-अ, २९५ -अ, २९८ आणि ५०५ अन्व्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.त्याचवेळी आरोपी असिस्टंट प्रोफेसर डॉ. जितेंद्र यांनी माफीनाम्यात लिहिले आहे की, त्यांच्या शिकवणीचा उद्देश धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता तर बलात्कार हा समाजाचा एक भाग असल्याचे स्पष्ट करणे हा होता. याप्रकरणी वाद वाढल्यानंतर बुधवारी एएमयूने सहाय्यक प्राध्यापकास कारणे दाखवा नोटीस बजावली होती.वास्तविक, असिस्टंट प्रोफेसर डॉ जितेंद्र कुमार यांनी लेक्चर दरम्यान प्रोजेक्टरवर दाखवलेल्या पॉईंट्समध्ये आक्षेपार्ह गोष्टी लिहून एका धर्माच्या भावना दुखावल्या, ज्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. AMU प्रशासनाने सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि २४ तासांत उत्तर मागितले होते. एएमयू प्रॉक्टरने या वादावर ही माहिती दिली AMU प्रॉक्टर डॉ वसीम अली यांनी सांगितले की, व्याख्यानादरम्यान, फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ जितेंद्र यांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या निदर्शनास काही आक्षेपार्ह-धार्मिक भावना दुखावल्या होत्या, ज्याचा फोटो व्हायरल झाला होता. एएमयूचे कुलगुरू तारिक मन्सूर यांनी स्वत: या प्रकरणाचे गांभीर्य दाखवले असून लवकरच याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे सांगितले. भाजप नेत्याने प्राध्यापकाविरोधात तक्रार दिलीएएमयूचे माजी विद्यार्थी आणि भाजप नेते डॉ निशांत शर्मा म्हणाले की, मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जितेंद्र यांनी बलात्काराच्या घटनेबद्दल शिकवताना हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह असे वर्गाला शिकवले आहे. याप्रकरणी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विभागाच्या अध्यक्षांसह सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ निशांत शर्मा यांच्या मते, 'अध्यक्षांच्या माहितीशिवाय असिस्टंट प्रोफेसरने हे सर्व शिकवले नाही. अध्यक्षांनाही याची माहिती असेल. अध्यक्ष व सहाय्यक प्राध्यापकावर गंभीर कारवाई होणे गरजेचे आहे. हे लोक हिंदू देवतांचा अपमान करत आहेत.